नाशिक - राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत जाहीर माफी मागावी, यासाठी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भाजपकडून तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी राहुल गांधी यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत त्यांच्या पोस्टरला भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी जोडे मारत त्यांचा निषेध केला.
नाशिकमध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपकडून जोडे मारो आंदोलन - Nashik BJP News
नाशिकमध्ये भाजपने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत जाहीर माफी मागवी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले.आंदोलनामुळे सीबीएस मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.
नाशिकमध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात भाजप कडून आंदोलन
यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी डोक्याला काळ्या पाट्या बांधून राहुल गांधींच्या पोस्टरला जोडे मारले. 'माफी मागा माफी मागा राहुल गांधी माफी मागा' अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. आंदोलनामुळे सीबीएस मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
Last Updated : Dec 16, 2019, 4:58 PM IST