नाशिक-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा दयावा. या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी नाशिक महानगराच्यावतीने रविवार कारंजा येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी ठाकरे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपा आक्रमक; ठाकरे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी - bjp agitation nashik
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देवून जो धक्कादायक खुलासा केला. त्यामध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दर महिन्याला १०० कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिले होते. म्हणूनच सचिन वाझे यांची नियुक्ती करावी असा त्यांचा आग्रह होता.
हेही वाचा-अखेर दिवस उजाडला..! कोरोनाचे नियम पाळत एमपीएससीच्या परीक्षेला सुरुवात
सोशल डिस्टंसिंगचे पालन न करता आंदोलन
राज्यातील राजकारण चांगलेच तापले असताना भाजपच्यावतीने रविवार कारंजा येथे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा मागणीसाठी जोरदार आंदोलन करण्यात आले आहे. शिवरायांच्या महाराष्ट्रात खंडणी मागणाऱ्या सरकारचा धिक्कार असो... लागू करा… लागू करा…राष्ट्रपती राजवट लागू करा. धिक्कार असो… धिक्कार असो… खंडणी पॅटर्नचा धिक्कार असो… अशा जोरदार घोषणा आंदोलन करते वेळी कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत. या आंदोलनाप्रसंगी भापाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, भाजपा महिला शहराध्यक्षा हिमगौरी आडके या संह भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनेउपस्थित होते. या आंदोलनादरम्यान भाजप कार्यकर्त्यांकडून सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडालेला दिसून आला.
हेही वाचा-कोरोनाचा हॉटस्पॉट ! मालेगावातील चित्रपटगृहात प्रेक्षकांची तुफान गर्दी