नाशिक - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील स्मार्ट सिटी योजनेत 700 कोटींचा घोटाळा भाजप नेते प्रसाद लाड यांच्या संबंधित कंपनीने केला असून त्याची कागदपत्रे किरीट सोमैयांना दिली असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असता ते पत्रकारांशी बोलत होते.
काय बोलले राऊत -
राजय राऊत हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते आहे की शिवसेनेचे प्रवक्ते आहे, असे किरीट सोमैया यांनी म्हटले होते. यावर राऊत म्हणालेत 'मी ठाकरेंचा प्रवक्ता आहे. शरद पवार देशांचे नेते आहे. त्यांना तर पंतप्रधान मोदीदेखील आपले गुरू मानतात. थोडक्यात सोमैया पवार यांच्यावर टीका करून थेट पंतप्रधान याचा अपमान करत आहे. मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील घोटाळ्यासंदर्भात कागदपत्रे सोमैया यांना पाठवले आहे. मात्र त्यावर ते बोलत नाही, असा प्रश्नदेखील राऊत यांनी उपस्थित केला.
कोणी कितीही फडफड केली. तरी सरकार पाच वर्षे टिकेल आणि पुढे 25 वर्ष हेच सरकार राहील. सीबीआय, ईडी हे सगळे वापरून झाले आता सरकार पडण्यासाठी सैन्य बोलवले तरी सरकारने पडणार नाही. दरम्यान, नबाब मलिक यांनी जे प्रश्न उपस्थित केले ते न्यायालयात योग्य की आयोग हे ठरतील. तर आर्यंनवर कारवाई करणारे काही पंच गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते आणि काही भाजपा पदाधिकारी होते, असेही ते म्हणाले.
हेही वाचा -मेक्सिकोत टोळीयुद्धात हिमाचलच्या मुलीचा मृत्यू, अमेरिकेत अभियंता म्हणून होती कार्यरत