महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Kirit Somaiya Attack On Mumbai Corporation कोरोना काळात मुंबई महापालिकेने केलेल्या खरेदीचे ऑडिट होणारच - किरीट सोमय्या

भाजपनेते किरीट सोमय्या ( Bjp Leader Kirit Somaiya Attack On Mumbai Municipal Corporation) यांनी मुंबई महापालिकेने ( Mumbai Municipal Corporation ) कोरोना काळात केलेल्या खरेदीचे ऑडीट ( Mumbai Municipal Corporation Audit of Corona purchases ) होणारच असल्याचा इशारा आज नाशिक येथे दिला. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर ( Shiv Sena Leader Kishori Pednekar ) आणि संजय राऊतांचे ( Shiv Sena Mp Sanjay Raut ) मित्र सुधीर पाटकर यांनी बोगस कंपन्या उभारत अनेक कॉन्ट्रॅक्ट मिळवल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे मुंबई महापालिकेचे आयुक्त ऑडीटला घाबरत असल्याचा हल्लाबोलही त्यांनी केला.

Bjp Leader Kirit Somaiya
भाजपनेते किरीट सोमय्या

By

Published : Dec 21, 2022, 6:12 PM IST

नाशिक -कोरोना काळात मुंबई महापालिकेने ( Mumbai Municipal Corporation ) केलेल्या वस्तूंच्या खरेदीचे ऑडिट ( Audit of Corona purchases ) होणारच असल्याची माहिती भाजपनेते किरीट सोमय्या ( Bjp Leader Kirit Somaiya Attack On Mumbai Municipal Corporation) यांनी आज नाशिकमध्ये दिली. त्यासह त्यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त ऑडिटला ( Mumbai Municipal Corporation Audit of Corona purchases ) का घाबरत आहेत, असा सवालही उपस्थित केला. नाशिकला एका कार्यक्रमाला आले असते ते पत्रकारांशी बोलत होते..

कोरोना काळात मुंबई महापालिकेने केलेल्या खरेदीचे ऑडिट होणारच - किरीट सोमय्या

घोटाळे उघड होण्याची भीतीमुंबई महापालिकेच्या तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर ( Shiv Sena Leader Kishori Pednekar ) आणि संजय राऊत ( Shiv Sena Mp Sanjay Raut ) यांचे मित्र सुधीर पाटकर यांनी बोगस कंपन्या उभारत अनेक कॉन्ट्रॅक्ट मिळवले. हे सर्व घोटाळे उघड होण्याची भीती आहे. यामुळेच महापालिका आयुक्त ऑडिट ( Bjp Leader Kirit Somaiya Attack On Mumbai Municipal Corporation) करण्यास नकार देत आहेत. मुंबई महापालिका आयुक्तांनी आम्हाला कायदा शिकवू नये, असा सल्लाही भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आयुक्तांना दिला.

120 रुपयांचा कागद देखील देता आला नाहीआयएनएस विक्रांत संदर्भात हायकोर्टात संजय राऊत ( Shiv Sena Mp Sanjay Raut ) यांना 57 हजाराचा कागद देखील सादर करता आले नाही. एफआयआर दाखल झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचे 120 दिवस सरकार होते. मात्र या सरकारला विक्रांत घोटाळा संदर्भात 120 रुपयांचा सादर करता आला नसल्याचा हल्लाबोल किरीट सोमय्या ( Bjp Leader Kirit Somaiya ) यांनी केला.

पुढचा नंबर अनिल परब यांचान्यायालयाने अनिल परब यांचे रिसॉर्ट बेकायदेशीर ठरवले आहे. अनिल परब ( Shiv Sena Leader Anil Parab ) यांनी केलेले सगळे घोटाळे उघडकीस येणार असून त्यांचा संपूर्ण हिशोब होणार असल्याचा इशाराही यावेळी किरीट सोमय्यांनी ( Bjp Leader Kirit Somaiya Attack On Mumbai Municipal Corporation ) दिला.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details