महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कलम 370 रद्द : नाशिकमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष; पालकमंत्री महाजनांचा ढोल-ताशावर ठेका - नाशिक भाजप

सरकारने घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक असून, यामुळे जम्मू-काश्मीरचा विकासासोबतच देश दहशतवाद मुक्त होईल, असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे.

सरकारने घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक असून, यामुळे जम्मू-काश्मीरचा विकासासोबतच देश दहशतवाद मुक्त होईल, असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे.

By

Published : Aug 5, 2019, 4:47 PM IST

नाशिक - जम्मू-काश्मीरमधील कलम 370 व 35अ रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारने घेतल्यानंतर याचे देशभरातील भाजप पदाधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात येत आहे. भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत या निर्णयाचा आनंदोस्तव साजरा केला. सरकारने घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक असून, यामुळे जम्मू-काश्मीरचा विकासासोबतच देश दहशतवाद मुक्त होईल, असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे.

सरकारने घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक असून, यामुळे जम्मू-काश्मीरचा विकासासोबतच देश दहशतवाद मुक्त होईल, असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे.

स्वतंत्र भारताच्या इतिहासात जम्मू-काश्मीर मधील कलम 370 संदर्भात पहिल्यांदाच असा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. मोदी सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर देशभरातील हिंदुत्ववादी संघटनांकडून या निर्णयाचे आणि मोदी सरकारचे जोरदार स्वागत करण्यात येत आहे. नाशिकच्या वसंतस्मृति कार्यालयाबाहेर साजऱ्या झालेल्या या आनंदोत्सवात शहराच्या महापौरांसह, भाजप आमदार आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details