नाशिक- शिवसेनेचा टॅगलाईन चोरल्याचा आरोप हा खोटा असून विरोधी पक्षांना आदिवासी, ओबीसी महिला मंत्री झाल्याचे दुःख आहे. त्यामुळे ते असे आरोप करीत आहेत, असा घणाघाती टोला विरोधी पक्षांना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी लगावला आहे. राज्याच्या विकासासाठी व देशाच्या विकासासाठी तुमची मुलगी म्हणून मी नक्कीच काम करेन. हे काम करतांना नाशिक जिल्ह्यावर माझे विशेष लक्ष राहणार असल्याचे माझे प्रयत्न राहील असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ.भारती पवार यांनी चांदवड येथील जन आशीर्वाद यात्रेप्रसंगी केले आहे.
देशामध्ये 55 कोटी तर राज्यात पाच कोटी जनतेचे लसीकरण झाले
जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार या नाशिक दौऱ्यावर होत्या. त्यावेळी चांदवड येथे पत्रकारांशी बोलतांना त्या म्हणाल्या की, देशातील नागरिकांचे आरोग्य समस्या जाणून घेऊन त्या समस्या सोडविण्याकडे आरोग्य मंत्रालयाचा कल आहे. आणि त्या दृष्टिकोनातून पावले उचलली जात आहे. देशांमध्ये 55 कोटी तर राज्यात पाच कोटी जनतेची लसीकरण झाले आहे. असे सांगून पवार म्हणाले की, राज्यातील जनतेला अधिक चांगले आरोग्य मिळावे आणि आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी मी स्वतः लक्ष घालणार आहे.आणि त्या दृष्टिकोनातून पावले उचलणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशातील सर्व राज्य व आरोग्याच्या दृष्टीने काटेकोरपणे लक्ष आहे. त्यामुळे देशात आरोग्य संपदा लाभावी म्हणून आरोग्य विभाग पावले उचलत असून येणाऱ्या काळात आपल्याला सर्वांना जाणवेल असे पवार यांनी या वेळी सांगितले आहे.