नाशिक- लोकसभा निवडणुकीत भाजपला राज्यात मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे. या यशाचे श्रेय मुख्यमंत्र्यांना असले तरी गिरीष महाजन हे 'मॅन ऑफ द मॅच' असल्याचे बोलले जात आहे. उत्तर महाराष्ट्रातल्या आठही जागा मोठ्या फरकाने निवडणून आणण्याचा 'करिष्मा' गिरिष महाजन यांनी करून दाखवला आहे. त्यामुळे सहाजिकच राज्यात आणि केंद्रातही गिरिष महाजन यांचे राजकीय 'वजन' आणखी वाढले आहे.
सरकारचे संकटमोचक असलेल्या गिरिष महाजन यांनी लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा आपला करिष्मा करून दाखवला आहे. उत्तर महाराष्ट्रतल्या नाशिक, दिंडोरी, धुळे, जळगाव, रावेर, नंदुरबार, शिर्डी आणि नगर या सगळ्या जागांची जबाबदारी गिरिष महाजन यांनी घेतली होती. यापैकी दिंडोरी, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जागांबाबत संभ्रम होता. तेव्हा महाजनांनी आठही जागेवर भाजपचे उमेदवार मोठ्या फरकाने निवडणून येतील, असा दावा केला होता. तो खरा ठरला आहे.
उत्तर महाराष्ट्रात लाखांच्या फरकाने निवडूण आलेले उमेदवार -
दिंडोरी -
भारती पवार - 5,67,098
धनराज महाले - 3,68,287
दोघांमधील फरक - 1,98,811
नाशिक-
हेमंत गोडसे - 5,61,812
समिर भुजबळ - 2,70,731
दोघांमधील फरक - 2,91,081