महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शरद पवारांच्या बैठकीवर भ‍ाजपचा बहिष्कार... - शरद पवार नाशिक दौरा

करोनाबाबत संबंधित खात्यातील मंत्री किंवा पालकमंत्री यांच्यासह सत्तेत सहभागी असलेल्या मंत्रिमंडळाला आढावा बैठक घेता येते. मात्र, शरद पवार हे कायद्यानुसार बैठक घेऊन शकत नाहीत असे भाजपचे म्हणणे आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पवार यांच्या बैठकीला परवानगी दिलीच कशी, असा सवाल आ.प्रा. देवयानी फरांदे यांनी उपस्थित केला आहे.

bjp-boycotts-sharad-pawars-meeting-at-nashik
शरद पवारांच्या बैठकीवर भ‍ाजपचा बहिष्कार...

By

Published : Jul 24, 2020, 3:22 PM IST

नाशिक- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार जिल्हाधिकारी कार्यालयात थोड्याच वेळात आढावा बैठक घेणार आहेत. मात्र, या बैठकीवरुन राजकीय वातावरण तापले आहे. पवार हे फक्त एका पक्षाचे अध्यक्ष असून सध्या ते खासदार आहेत. त्यांच्याकडे कोणतेही मंत्रीपद नाही. असे असताना ते बैठक कशी घेऊ शकतात, असा प्रश्न भाजपने उपस्थित केला आहे.

शरद पवारांच्या बैठकीवर भ‍ाजपचा बहिष्कार...

विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या दौर्‍यात शासकीय अधिकार्‍यांनी उपस्थित राहू नये, असे परिपत्रकाद्वारे अ‍ादेश देण्यात आले आहेत. महाविकास आघाडी राजकारण करत असल्याचा आरोप करत भाजपने पवार यांच्या बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. तसेच या बैठकीस उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे.


करोनाबाबत संबंधित खात्यातील मंत्री किंवा पालकमंत्री यांच्यासह सत्तेत सहभागी असलेल्या मंत्रिमंडळाला आढावा बैठक घेता येते. मात्र, शरद पवार हे कायद्यानुसार बैठक घेऊन शकत नाहीत असे भाजपचे म्हणणे आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पवार यांच्या बैठकीला परवानगी दिलीच कशी, असा सवाल आ.प्रा. देवयानी फरांदे यांनी उपस्थित केला आहे. या अगोदर झालेल्या बैठकांना शहरातील भाजप आमदारांना बोलविण्यात आले नाही, असा नाराजीचा सूरही भाजपच्या गोटातून व्यक्त होत आहे.

राजेश टोपे हे आरोग्य खात्याचे मंत्री असून ते बैठक घेऊ शकतात. मात्र शरद पवार यांच्या उपस्थितीला भाजपने विरोध केला आहे. भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनीही आक्षेप नोंदवला असून ही बैठक आरोग्य मंत्री राजेश टोपे पालकमंत्री छगन भुजबळ आणि स्थानिक आमदार यांच्या सोबत घेतली पाहिजे असे म्हटले आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत चर्चा केली जाणार असल्याचे शहराध्यक्ष पालवे यांनी सांगितले. एकूणच पवार यांच्या बैठकीवरुन महाविकास आघाडी विरुध्द भाजप असा नवा वाद रंगण्याची जोरदार चिन्हे आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details