नाशिक- संपूर्ण राज्यात सोमवारी (दि. 20 जुलै) भाजप, शिवसंग्राम राज्य सरकार विरोधात आंदोलन करणार आहे. दूध उत्पादकांना योग्य भाव मिळत नसल्यामुळे हे आंदोलन करण्यात येणार आहे. सरकार प्रतिलिटर दुधाचा भाव 25 रुपये म्हणत आहे. मात्र, तो भाव दूध उत्पादकांना कुठेही मिळत नाही. कोणतीच संस्था भाव देत नाही अगदी 15 ते 20 रुपये भाव मिळतो. त्यामुळे सरकारने दूध उत्पादकांना 10 रुपये प्रति लिटर अनुदान द्यावे, ही मागणी केली जाणार आहे. जर उद्याच्या आंदोलणाची सरकारने दखल न घेतल्यास 1 ऑगस्टला तीव्र आंदोलन करणार, असा इशारा मेटे यानी दिला आहे.
दूध उत्पादकांना अनुदान मिळावे, यासाठी भाजप अन शिवसंग्रामचे सोमवारी राज्यव्यापी आंदोलन - भाजपचे राज्यव्यापी आंदोलन
राज्य सरकारने प्रति लिटर दुधाचा भाव 25 रुपये जाहिर केला आहे. पण, प्रत्यक्षात 15 ते 20 रुपये भाव मिळतो. यामुळे सरकारने दुध उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रतिलिटर 10 रुपयांचा अनुदान द्यावे, या मागणीसाठी उद्या भाजप व शिवसंग्राम यांच्याकडून राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिली.
मराठा आरक्षणाबात चिंता
मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे. मराठा आरक्षणात सरकारचा भोंगळ कारभार दिसून येत आहे. ठाकरे सरकार आरक्षणाकडे गांभीर्याने दखल घेत नाही. यांच्या चुकीच्या धोरणामुळे आरक्षणबाबत होणाऱ्या निर्णयाची चिंता वाटत आहे. मात्र, सर्वोच न्यायालयात सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे करू नये. यात जर चुकून काही निर्णय झाला तर याला जबाबदार तिन्ही पक्ष असणार असल्याचा घणाघात विनायक मेटेनी केला आहे.
ठाकरे सरकार लोकशाहीचा खून करत आहे.
ठाकरे सरकारने ग्रामपंचायतीवर जो प्रशासक नेमण्याचा ठरवले हे षडयंत्र आहे. आता ग्रामपंचायतीच्या निवडणूक डोळ्या समोर ठेऊन हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ठाकरे सरकार लोकशाहीचा खून करत असल्याचा आरोप विनायक मेटेनी केला आहे.
ठाकरे सरकारसाधूसंतांच्या विरोधात
इंदुरीकर महाराजांना शिवसंग्रामने पाठिंबा दिला होता. इंदुरीकर महाराजांचे काम मोठे आहे. त्यांना अडकवण्याचे षडयंत्र आहे. ठाकरे सरकार साधू संतांच्या विरोधातील सरकार आहे. मात्र, आम्ही आजही त्यांच्या पाठीशी आहे. उद्या ही त्यांच्या पाठीशी उभ राहणार असल्याचे विनायक मेटे यांनी सांगितले.