नाशिक - महाविकास आघाडी सरकारविरोधात येवल्यात भाजपच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. येवल्यातील तहसील कार्यालयावर हे आंदोलन करण्यात आले.
'महाविकास आघाडी'विरोधात येवल्यात भाजपचे धरणे आंदोलन - protest against mahavikas aghadi government
महाआघाडी सरकारविरोधात येवल्यातील तहसीलवर भाजपने धरणे आंदोलन केले.
!['महाविकास आघाडी'विरोधात येवल्यात भाजपचे धरणे आंदोलन yevala bjp](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6197862-thumbnail-3x2-d.jpg)
यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा, महिलांवर वाढत्या अत्याचारावर लगाम लावण्यात यावा, शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये भरपाई द्यावी, तसेच महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी व भाजप सरकारने सुरू केलेल्या योजना स्थगित करू नये, अशा विविध प्रकारच्या मागण्या करता तालुका व शहर भाजपच्यावतीने तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा -कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील दोन गावात आधार प्रमाणीकरणास सुरुवात