नाशिक - छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) राज्य हे भोसल्यांचे राज्य असे कुणी म्हटले नाही तर रयतेचे राज्य असे म्हटले आहे. त्याप्रमाणे या देशाचा मूळ मालक म्हणजे आदिवासी (Tribal). त्यांची अवस्था जी खराब झालीय ती बदलण्याची गरज आहे. तसेच बिरसा मुंडा (Birsa Munda) यांचा वारसा जपला पाहिजे. आदिवासी संस्कृती (Tribal culture) जपली पाहिजे. मूलभूत अधिकार जतन करणे हे आदिवासी यांनी लक्षात घेतले पाहिजे, अशी अपेक्षा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी व्यक्त केली आहे.
देशाचे मूळ मालक म्हणजे आदिवासी -
इगतपुरी तालुक्यातील सोनोशी गावात क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या स्मरणार्थ सन्मान बाडगीच्या माचीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या देशाचा मूळ मालक म्हणजे आदिवासी. त्यांची अवस्था जी खराब झालीय ती बदलण्याची गरज आहे. बिरसा ब्रिगेडच्या माध्यमातून आपण आठवणींचे स्मरण करतोय. आदिवासींचा आज आपण सन्मान करतोय. आदिवासी हे जगाचे मालक हे वाक्य काही माझे नाही, देशाचे सर्वोच्च न्यायाधीश यांचे आहे. जंगल संस्कृतीचे रक्षण करण्याचे काम आदिवासी करतोय. वनसंपत्ती जतन करण्याची कामगिरी आदिवासी यांनी केली. अत्याचार होत असेल तर वेळप्रसंगी संघर्ष करावा लागेल. संघर्ष म्हणजे नक्षलवाद नव्हे. अन्यायाच्या विरोधात लढतो तो आदिवासी, असे गौरवोद्गार पवार यांनी यावेळी काढले आहे.
हेही वाचा -ST Workers strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा - मंत्री भारती पवार