महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सीसीटीव्ही : नाशिकच्या गोळे कॉलनी परिसरातून दिवसाढवळ्या चोरट्याने केली दुचाकी लंपास - नाशिक जिल्हा बातमी

नवीन नाशिक परिसरात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. गोळे कॉलनी परिसरात भरदविसा वाहन चोरीची घटना झाली असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

चोरटा
चोरटा

By

Published : Jun 8, 2021, 3:45 PM IST

Updated : Jun 8, 2021, 4:40 PM IST

नाशिक- नाशिकमध्ये दुचाकी चोरीच्या घटनांध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असतानाच आता भरदिवसा वाहन चोरीला गेल्याची घटना गोळे कॉलनी परिसरात घडली असून हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

सीसीटीव्ही

नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून वाहन चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच नवीन नाशिक परिसरात दुचाकी चोरी गेल्याची घटना ताजी असतानाच आता या चोरट्यांनी भरदिवसा चोरी करण्यापर्यंत मजल गाठली आहे. नाशिकच्या गोळे कॉलनी परिसरात एका चोरट्याने दिवसाढवळ्या दुचाकी चोरून नेली आहे. बजरंगवाडी याठिकाणी राहणाऱ्या विशाल वाघ या तरुणाने आपली दुचाकी गोळे कॉलनी परिसरात पार्क करून हा युवक कामानिमित्ताने गेला असताना एका चोरट्याने गाडी भरदिवसा चोरून नेल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

दुचाकी चोरट्यांचा बंदोबस्त पोलिसांनी करावा, नागरिकांची मागणी

यापूर्वीही दुचाकी चोरीचे प्रकार गोळे कॉलनी परिसरात अनेकदा घडले आहेत. काही दिवसांपूर्वीच अंबड पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या त्रिकुटाला ताब्यात घेतले होते. मात्र, पुन्हा एकदा असाच प्रकार घडल्याने आता पोलिसांनी या दुचाकी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Last Updated : Jun 8, 2021, 4:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details