महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिकमधील सीएनजी, पीएनजी गॅस प्रकल्पाचा भुजबळांकडून आढावा - Minister Chhagan Bhujbal Latest News Nashik

शहरात महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या वतीने सीएनजी व पीएनजी भूमिगत गॅस पाईपलाईन प्रकल्प राबवण्यात येत आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नॅचरल गॅस लिमिटेडच्या कार्यालयाला भेट देऊन, या प्रकल्पाचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत माजी खासदार समीर भुजबळ यांची देखील उपस्थिती होती.

नाशिकमधील सीएनजी, पीएनजी गॅस प्रकल्पाचा भुजबळांकडून आढावा
नाशिकमधील सीएनजी, पीएनजी गॅस प्रकल्पाचा भुजबळांकडून आढावा

By

Published : Feb 7, 2021, 10:46 AM IST

नाशिक -शहरात महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या वतीने सीएनजी व पीएनजी भूमिगत गॅस पाईपलाईन प्रकल्प राबवण्यात येत आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नॅचरल गॅस लिमिटेडच्या कार्यालयाला भेट देऊन, या प्रकल्पाचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत माजी खासदार समीर भुजबळ, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे प्रकल्प अधिकारी संदीप श्रीवास्तव, अभियंता आदित्य रामदासी यांची उपस्थिती होती.

नाशिक शहरात महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या वतीने भूमिगत गॅस पाईप लाईन प्रकल्पाचे काम सुरू आहे. या वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात नाशिकमध्ये 30 सीएनजी स्टेशनची निर्मिती पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर आतापर्यंत नाशिक शहरातील २५ हजार ग्राहकांनी पीएनजी घरगुती गॅस जोडणी बाबत नोंदणी केली आहे. त्यातील जवळपास २० हजार घरांतील गॅस पाईपलाईन जोडणीचे काम पूर्ण झाले आहे. यासाठी नाशिक शहरात हायप्रेशर, मिडीयम प्रेशर व लो प्रेशर पाईप लाईनचे काम प्रगतीपथावर असून, लवरकरच नागरिकांना घरगुती गॅस उपलब्ध होणार आहे. तसेच सीएनजी स्टेशनच्या माध्यमातून शहरातील फोर व्हीलर वाहने तसेच बसेसला गॅस उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर औद्योगिक वापरासाठी देखील गॅस उपलब्ध होणार आहे.

काम तातडीन पूर्ण करण्याच्या सूचना

या सर्व प्रकल्पाच्या कामकाजाची मंत्री छगन भुजबळ यांनी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे प्रकल्प अधिकारी संदीप श्रीवास्तव, अभियंता आदित्य रामदासी यांच्याकडून घेऊन, लवकरात लवकर ही कामे पूर्ण करून नागरिकांना गॅसच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details