महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

VIDEO : नांदगाव येथील आढावा बैठकीत आमदार सुहास कांदे यांच्याशी झालेल्या शाब्दिक चकमकीबाबत भुजबळ म्हणाले.. - छगन भुजबळांची प्रतिक्रिया

नांदगाव येथे झालेल्या आढावा बैठकीमध्ये पालकमंत्री छगन भुजबळ व शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्यात आपत्कालीन निधीच्या मुद्द्यावरून खडाजंगी झाले. अचानक घडलेल्या घटनेमुळे आढावा बैठकीत गोंधळ उडाला होता. या शाब्दिक चकमकी यासंदर्भात भुजबळांनी येथे प्रतिक्रिया दिली.

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal

By

Published : Sep 11, 2021, 9:05 PM IST

Updated : Sep 11, 2021, 10:06 PM IST

नाशिक -नांदगाव येथे आढावा बैठकीत भुजबळ व कांदे यांच्यात झालेल्या शाब्दिक चकमक की संदर्भात भुजबळ यांनी येवला येथे आले असता त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. येवला मतदारसंघात भुजबळांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. महाराष्ट्र सदन प्रकरणी न्यायालयाने निर्दोष मुक्त केल्यानंतर भुजबळ प्रथमच मतदारसंघात आले होते.

छगन भुजबळ पत्रकार परिषदेत बोलताना
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन प्रकरणी न्यायालयाने निर्दोष मुक्त केल्यानंतर प्रथमच भुजबळ परिवार आपल्या येवला मतदारसंघात आले. यावेळी नगरसुल येथील ग्रामस्थांनी व भुजबळ समर्थकांनी मंत्री छगन भुजबळ यांचे जल्लोषी स्वागत केले.
छगन भुजबळांचे येवल्यात जल्लोषी स्वागत

यावेळी नांदगाव येथे झालेल्या आढावा बैठकीमध्ये पालकमंत्री छगन भुजबळ व शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्यात आपत्कालीन निधीच्या मुद्द्यावरून खडाजंगी झाले. अचानक घडलेल्या घटनेमुळे आढावा बैठकीत गोंधळ उडाला होता. या शाब्दिक चकमकी यासंदर्भात भुजबळांनी येथे प्रतिक्रिया दिली.

हे ही वाचा -साकीनाका बलात्कार प्रकरण : एका महिन्यात दोषारोपपत्र दाखल करा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

काय म्हणाले भुजबळ -

येवल्यात छगन भुजबळ म्हणाले की, नांदगाव येथे झालेल्या आढावा बैठकीत शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी व त्यांच्याबरोब असणाऱ्या 10 ते 12 समर्थकांनी आपातकालीन निधी तात्काळ देण्याची मागणी केली. मात्र आपातकालीन निधी असा काही प्रकार नसतो. राजकारणात ते नवीन असल्याने त्य़ांना सरकार व प्रशासन कसे चालते याची कमी समज आहे. मंजूर धोरणानुसार निधी वितरीत करावा लागतो किंवा कॅबिनेट मीटिंगमध्ये यासाठी धोरण ठरवावे लागते.

Last Updated : Sep 11, 2021, 10:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details