नाशिक - संपूर्ण राज्यात गणरायाचे थाटात आगमन झाले आहे. यासोबतच गणपती उत्सवात गौरी गणपतींची भर पडली आहे. महाराष्ट्रात विविध पारंपरिक पध्दतीने आज (गुरुवारी) अनेक घरांमध्ये गौरी गणपतींचे मोठ्या थाटामाटात वाजत-गाजत आगमन झाले. त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न झाले आहे.
गौरी गणपती विशेष : नाशिकचे बेळे कुटुंब जपतयं 700 वर्षाची परंपरा हेही वाचा -करुया संकल्प जलसंवर्धनाचा, नाशिकचा मानाचा राजा मित्र मंडळ कार्यकर्त्यांशी खास बातचीत
शहरातील बेळे कुटुंबातही गौरीचे आगमन झाल्याने त्यांचा ही आंनद गगनात मावेनासा झाला आहे. बेळे परिवारातील या गौरी सातशे वर्षांपासून त्यांच्या घरी येत आहेत. त्यांच्या गौरी भिंतीवर अष्टगंधाच्या माध्यमातून साकारल्या जातात. त्याची दरवर्षी बेळे कुटुंब अगदी मनोभावे पूजा करतात.
हेही वाचा - नाशिकमध्ये गौरी पुजेची तयारी जोरात; बाजारपेठा सजल्या
तसेच यावेळी देखील या परिवाराने आपल्या गौरी आगमनाच्या माध्यमातून पर्यावरण पूरक गणेश उत्सव असा संदेश देखील दिला आहे. देखाव्यात त्यांनी बेळे पार्क हे पुठ्यापासून साकारले आहे. त्यात आपल्या गौरीची प्राणप्रतिष्ठा केली आहे. तर अगदी आपल्या मुलीप्रमाणे हे कुटुंब गौरी महालक्ष्मीना तीन दिवस आपल्या घरात उत्साहपूर्ण वातावरणात ठेवत असतात.