नाशिक - नाशिकमध्ये एका सराईत गुंडाकडून चाकूचा धाक दाखवत महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना सिडको परिसरात घडली आहे. संशयित आरोपी पॅरोलवर मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आला होता, असे देखील पोलीस तपासात समोर येत आहे. याबाबत अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ब्युटी पार्लर व्यावसायिक महिलेवर गुन्हेगाराकडून चाकूचा धाक दाखवत अत्याचार - नाशिकमध्ये महिलेवर अत्याचार
एका सराईत गुंडाकडून चाकूचा धाक दाखवत महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना सिडको परिसरात घडली आहे. संशयित आरोपी पॅरोलवर मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आला होता, असे देखील पोलीस तपासात समोर येत आहे. याबाबत अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अंबड पोलीस ठाण्यातकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, नाशिक शहरातील सिडको परिसरात असलेल्या पवन नगर येथे ब्युटी पार्लरचा व्यवसाय करणाऱ्या एका महिलेवर ती आपल्या पार्लरमध्ये पूजा करत असतांना संशयित आरोपीने दुकानात प्रवेश केला आणि तिने चाकूचा धाक दाखवून या महिलेच्या तोंडात बोळा कोंबून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित महिला ही विधवा असून याबाबत अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटना घडल्यानंतर आरोपी हा फरार झाला असून त्याच्या शोधासाठी अंबड पोलिसांनी चार पथके तयार केली आहे.
संशयित आरोपी हा खुनाच्या गुन्ह्यात पुण्यामध्ये जेलमध्ये होता. अलीकडच्या काळामध्ये तो पॅरोलवर सुटून बाहेर आला होता. संशयित हा सुटल्यानंतर फरार झाला होता पोलिस त्याचा शोध घेत होते. त्यातच संशयीताने हे कृत्य केल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले असून नाशिकरांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. संशयित आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पथके तयार केली असून शोध घेण्यात येत असल्याचे अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चौधरी यांनी सांगितले.