नाशिक -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक व्यवसाय अडचणीत सापडले आहेत. अनलॉक 1 च्या काळात सरकारने अर्थचक्र सुरू राहावे यासाठी अनेक व्यवसाय सुरू करण्यास मुभा दिली आहे. मात्र, अद्यापही सलून आणि ब्युटी पार्लर सुरू करण्याबाबत कुठलाच निर्णय झाला नसून सलून व्यवसायासोबत महिलांचा उदरनिर्वाह चालणारे ब्युटी पार्लर सुरू करण्यास सरकारने परवानगी द्यावी. तसेच लॉकडाऊन काळात झालेल्या नुकसानीबाबत महिला सक्षमीकरणाच्या योजनेतून ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी ब्युटीपार्लर असोसिएशनने राज्य सरकारला केली आहे.
'महिला सक्षमीकरणाच्या योजनेतून ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलांना आर्थिक मदत करा' - नाशिक ब्युटी पार्लर न्यूज
एकट्या नाशिकमध्ये दोन ते अडीच हजार ब्युटी पार्लर असून यावर अनेक महिलांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. गेल्या तीन महिन्यांपासून हा व्यवसाय बंद असल्याने कर्जाचे हप्ते, जागेचे भाडे, कारागिरांचे पगार, असे अनेक प्रश्न त्यांना भेडसावत आहेत. त्यामुळे महिला सक्षमीकरणाच्या योजनेतून ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलांना सरकारने आर्थिक सहाय्य करावे. तसेच सद्य परिस्थितीत अटी शर्तीवर आम्हाला व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी ब्युटीपार्लर असोसिएशनने राज्य सरकारला केली आहे.
लॉकडाऊमुळे ब्युटी पार्लर बंद आहेत. इतर व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र, अद्यापही ब्युटी पार्लरला परवानगी दिली नाही. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेल्या महिलांना उदरनिर्वाह कसा करायचा? हा प्रश्न भेडसावत आहे. एकट्या नाशिकमध्ये दोन ते अडीच हजार ब्युटी पार्लर असून यावर अनेक महिलांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. गेल्या तीन महिन्यांपासून हा व्यवसाय बंद असल्याने कर्जाचे हप्ते, जागेचे भाडे, कारागिरांचे पगार, असे अनेक प्रश्न त्यांना भेडसावत आहेत. त्यामुळे महिला सक्षमीकरणाच्या योजनेतून ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलांना सरकारने आर्थिक सहाय्य करावे. तसेच सद्य परिस्थितीत अटी शर्तीवर आम्हाला व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी ब्युटीपार्लर असोसिएशनने राज्य सरकारला केली आहे.
अशी घेतली जाईल काळजी -
- पुरेसा सूर्यप्रकाश आणि मुबलक पाणी असलेला ब्युटी पार्लरला परवानगी देण्यात यावी.
- ब्युटी पार्लरमध्ये दोन खुर्च्यांमध्ये एक मीटरचे अंतर असेल
- ब्युटी पार्लर मध्ये ग्राहकांसाठी दुकाना बाहेर सॅनिटाझर डी स्पेशन बसविले जातील
- प्रत्येक ग्राहकाच्या शरीराचे तापमान तपासूनच दुकानात प्रवेश
- प्रत्येक थेरपिस्टने सर्व्हिस दिल्यानंतर हात धुवून निर्जंतुकीकरण केले जाईल
- ब्युटी पार्लरमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांनी आणि काम करणाऱ्या व्यक्तींनी मास्क परिधान करणे अनिवार्य राहील
- ग्राहकांसाठी प्रत्येकवेळी नॉपकिन, गाऊन नवीन वापरले जातील किंवा सोडियम हायपोक्लोराइडमध्ये किमान 30 मिनिटे ठेऊन निर्जंतुकीकरण केले जाईल
- प्रत्येक ग्राहकाची खुर्ची बसण्यापूर्वी निर्जंतुकीकरण केली जाईल