नाशिक- मालेगाव शहरात आज दस्तुर हिंद बचाव कमिटीच्या वतीने एनआरसी, सीएए विरोधात बत्ती गुल आंदोलन करण्यात आले. संपूर्ण शहराचे लाईट 7 ते 7:45 पर्यंत बंद करून सरकारच्या विरोधात एक अनोखे आंदोलन करण्यात आले. संपूर्ण शहर हे ब्लॅक आऊट झाले होते.
मालेगाव शहरात दस्तुर हिंद बचाव कमिटीच्या वतीने एनआरसी आणि सीएए कायद्याविरोधात अनोखे आंदोलन करण्यात आले. शहरातील दुकाने आणि घरांची लाईट बंद करून अनोखे आंदोलन करण्यात आले होते. संपूर्ण शहरात या दरम्यान रिक्षा चालकांनी सुध्दा आपले हेड लाईट बंद ठेवून रिक्षा चालवली.