महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिकच्या युवकांमध्ये 'बाप्पा' हेअर स्टाइलची धूम, केसांमध्ये अवतरले गणपती - अष्टविनायक

गणपती बाप्पाची पेंटिंग असलेली हेअर स्टाईल युवक-युवती आपल्या केसांवर करत आहेत. यामध्ये कोणी आपल्या केसांवर लालबागचा राजा तर कोणी सिद्धिविनायक, कोणी अष्टविनायक गणेश साकारताना दिसत आहे.

केसांमध्ये अवतरले गणपती

By

Published : Sep 10, 2019, 9:08 PM IST

नाशिक- युवकांमध्ये सध्या 'बाप्पा' हेअर स्टाइलची धूम दिसून येत आहे. शरणपूर रोड येथील अजंठा सलूनमध्ये केसांवर बाप्पांची वेगवेगळी रूप साकारण्यासाठी भक्तांची रांग लागली आहे.

केसांमध्ये अवतरले गणपती

हेही वाचा - नाशिक जिल्ह्यात संततधार; गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष सर्वत्र सुरू आहे. या गणेशोत्सावात सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व धार्मिक अशा विविध विषयावर आधारित देखावे प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहेत. अनेक वेग-वेगळ्या माध्यमातून गणपती बाप्पा वर असणारी श्रद्धाभाव दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा -येवला : विखरणी येथे विहिरीत आढळले दोन काळवीटांचे मृतदेह

असाच एक आगळा-वेगळा ट्रेंड नाशिकच्या तरुण-तरुणींमध्ये दिसून येत आहे. गणपती बाप्पाची पेंटिंग असलेली हेअर स्टाईल युवक-युवती आपल्या केसांवर करत आहेत. यामध्ये कोणी आपल्या केसांवर लालबागचा राजा तर कोणी सिद्धिविनायक, कोणी अष्टविनायक गणेश साकारताना दिसत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details