नाशिक -तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यात लागू असलेल्या निर्बंधात कोणतीही सूट अथवा शितीलता देण्यात आली नसून राजकीय व सामाजिक सर्व कार्यक्रम आणि सोहळ्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. मात्र, ऑनलाईन स्वरुपातवरील कार्यक्रम होऊ शकतात, असे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी कोरोना परिस्थिती आढावा बैठक पार पडली आहे. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री भुजबळ यांनी ही माहिती दिली.
'३ लाख ७९ हजार नागरिकांचे लसीकरण' -
जिल्ह्यात जून महिन्यात ७ हजार ५९१ कोरोना रुग्ण उपचार घेत होते. सद्यस्थितीत या संख्येत घट झाली असून एक हजार ५४८ रुग्ण उपचार घेत आहेत. दुसरी लाट आली तेव्हा कोरोना पाॅझिटिव्हिटी रेट ४१ टक्के होता. तो आता २.२ टक्के झाला असून जिल्ह्याचा मृत्यूदर राज्याच्या तुलनेत कमी आहे. आतापर्यंत जिल्ह्यात साधारण ३ लाख ७९ हजार लोकांना लसीकरणाचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. ऑगस्टमध्ये लस पुरवठा सुरळीत होईल, अशी चिन्हे असून कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी निर्बंधात शिथीलता देणे शक्य नसल्याचे भुजबळ म्हणाले.
'नागरिकांनीही वेळेच्या मर्यादेचे पालन करावे' -