महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुख्यमंत्रीपद गेल्याने फडणवीस फारच अस्वस्थ - बाळासाहेब थोरात - balasaheb thorat

भीमा कोरेगाव प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी केली जावी, असे मत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. मात्र, याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील, हेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

thorat
मुख्यमंत्रीपद गेल्याने फडणवीस फारच अस्वस्थ - बाळासाहेब थोरात

By

Published : Feb 16, 2020, 9:49 PM IST

Updated : Feb 16, 2020, 10:51 PM IST

नाशिक - मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार झाल्यापासून देवेंद्र फडणवीस फारच अस्वस्थ आहेत, असा टोला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी लगावला. फडणवीसांनी जनतेने दिलेल्या विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी पार पाडावी, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. वकील परिषदेच्या सांगता समारोप कार्यक्रमानंतर थोरात पत्रकारांशी बोलत होते.

मुख्यमंत्रीपद गेल्याने फडणवीस फारच अस्वस्थ - बाळासाहेब थोरात

हेही वाचा -तुमच्यात हिंमत असेल तर लावा नवीन निवडणूक; तुम्ही तिघे आम्ही एकटे

या कार्यक्रमात राज्यातील ४० वर्षांहून अधिक काळ वकिली केलेल्या २६ ज्येष्ठ वकिलांचा मंत्री छगन भुजबळ आणि बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. सावरकरांच्या मुद्द्यावर मत मतांतरे असून भाजपकडून त्याचा विपर्यास केला जात आहे. भीमा कोरेगाव प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी केली जावी, असे माझे मत होते. पण याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाच असेल, असे थोरात यांनी यावेळी स्पष्ट केले. 'हे सरकार पडेल अशी टीका सुरू आहे. मात्र सरकार पाच वर्ष टिकणार असून भाजप सरकार पाडण्याचे प्रयत्न करुच शकत नाही', असेही ते म्हणाले.

Last Updated : Feb 16, 2020, 10:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details