नाशिक -नाशिकचे मनसेचे माजी आमदार वसंत गिते यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला, यावरून मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी गिते यांचा चांगलाच समाचार घेतला. गिते यांनी केलेल्या एका वक्तव्याला नांदगावकर यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून उत्तर दिले आहे.
वसंत गिते हे भाजपमध्ये खूश नव्हते ही बाब लक्षात घेऊन, मनसेच्या नाशिकमधील नेत्यांनी गिते यांची भेट घेतली होती, आणि त्यांना मनसेत परतण्याची विनंती करण्यात आली. मात्र मी ज्या तीन व्यक्तींमुळे मनसे सोडली त्यांच्याबरोबर पुन्हा का काम करावे असा सवाल यावेळी गिते यांनी उपस्थित केला होता. यावेळी गिते यांचा रोख हा बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि अविनाश अभ्यंकर यांच्याकडे होता. गिते यांच्या या खोचक सवालाला बाळा नांदगावकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.