महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Leopard Cub Nashik : चिमुकलीने मांजरीचे पिल्लू समजून बछड्याला आणले घरात; पाहा, पुढे काय घडलं... - मांजरीचे पिल्लू समजून बछड्याला आणले घरात

मांजरीपेक्षा वेगळा रंग असल्याने आणि दिसायला गोंडस असल्याने मुलही त्याच्यासोबत खेळू लागले. अशात एक चिमुकली त्याला घरात घेऊन आली. हे मांजरीचे पिल्लू नसून ते बिबट्याचे बछडे ( Leopard calf at house Nashik ) असल्याचे कुटुंबाच्या लक्षात आल्यावर त्यांना धक्काच बसला. आठ दिवस बघून सुद्धा बछड्याची आई न आल्याने ठाकरे कुटुंबांनी बछड्याला वन विभागाच्या ( Forest Department Nashik ) स्वाधीन केले.

Leopard Cub Nashik
Leopard Cub Nashik

By

Published : May 12, 2022, 4:07 PM IST

Updated : May 12, 2022, 4:19 PM IST

नाशिक -मालेगाव येथील मोरझर शिवारातील रावसाहेब ठाकरे यांच्या शेतातील घराजवळ आठवडाभरापूर्वी एक मांजरीच्या पिल्लूसारखे दिसणारे पिलू घरातील लहान मुलांना दिसले. मांजरीपेक्षा वेगळा रंग असल्याने आणि दिसायला गोंडस असल्याने मुलही त्याच्यासोबत खेळू लागले. अशात एक चिमुकली त्याला घरात घेऊन आली. हे मांजरीचे पिल्लू नसून ते बिबट्याचे बछडे ( Leopard calf at house Nashik ) असल्याचे कुटुंबाच्या लक्षात आल्यावर त्यांना धक्काच बसला. आठ दिवस बघून सुद्धा बछड्याची आई न आल्याने ठाकरे कुटुंबांनी बछड्याला वन विभागाच्या ( Forest Department Nashik ) स्वाधीन केले.

प्रतिक्रिया देताना शेतकरी आणि वनाधिकारी



बिबट्या आला असे ऐकले तरी अनेकांच्या अंगाला घाम फुटतो. मात्र याला अपवाद ठरले आहे. मालेगावतील ठाकरे हे शेतकरी कुटुंब. वाट चुकलेले बिबट्याचे बछडे तब्बल आठवडाभर एका शेतकरी कुटुंबात मांजराच्या पिलुच्या भूमिकेत वाढले. बिबट्याचे हे बछडे आठवडाभर शेतकऱ्याच्या मायेखाली वाढल्याची घटना तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली. बछड्याची आई परत न आल्याने अखेर बछडे वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले. आठ दिवस हे बछडे कुटुंबाचे सदस्य म्हणून राहिल्याने घरातील लहान-मोठ्यांना गहिवरून आले होते.



...पण ती आलीच नाही :सावधगिरी बाळगत आणि बछड्याला मायेची उब देत ठाकरे कुटुंबानी त्याला दररोज दीड लिटर दूध पाजले. इतकेच नव्हे तर दररोज रात्री घराबाहेर ठेवून त्याची आई त्याला घेवून जाईल, अशी काळजी देखील घेतली. मात्र वाट चुकलेली बिबट्याची मादी आपल्या बछड्याला घायला आलीच नाही.

हेही वाचा -Villagers Left Village : देवीचा प्रकोप दूर करण्यासाठी संपूर्ण गावकरी गुरांसह जातात जंगलात राहायला; काय आहे 'या' गावाची गोष्ट

Last Updated : May 12, 2022, 4:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details