नाशिक Baban Gholap Resign : शिवसेना ठाकरे गटाचे माजी मंत्री बबनराव घोलप (Baban Gholap Resign) यांनी आपल्या उपनेतेपदाचा राजीनामा दिलायं. यामुळे ठाकरे गटाला नाशकात मोठा धक्का बसलायं. शिर्डी लोकसभा मतदार संघात निवडणुक लढवण्याची ते तयारी करत होते, अशातच माजी खासदार भानुदास वाकचौरे यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केलायं. यानंतर घोलप यांना संपर्क प्रमुखपदावरुन हटवल्यामुळं ते नाराज होते. मी अद्याप उपनेतेपदाचा राजीनामा दिला असला तरी अद्याप शिवसेनेतच असून दोन दिवसांत कार्यकर्त्यांशी चर्चा करुन आपण निर्णय घेऊ असंही घोलप यांनी पत्रकार परिषदेत सांगितलयं. (Shivsena Controversy Thackeray vs Shinde)
वाकचौरेंच्या उमेदवारीच्या चर्चेने घोलप नाराज : शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी बबनराव घोलप यांना शिर्डी लोकसभेच्या उमेदवारीचं आश्वासन दिलं होतं. घोलप यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघात संपर्क प्रमुख नेमून नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याच्या उद्धव यांनी सूचना दिल्या होत्या. मात्र उद्धव ठाकरे यांनी जुन्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उमेदवारीवर परस्पर शिक्कामोर्तब केल्याने बबनराव घोलप नाराज होते. यानंतर बबनराव घोलप यांनी मातोश्रीवर धाव घेत, उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली होती. तेव्हा वाकचौरे यांच्या संभाव्य उमेदवारीला देखील त्यांनी विरोध केल्याचं सूत्रांनी सांगितलयं. (Nashik Shivsena News)