महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिकमध्ये आयुर्वेद उपचाराचा प्रयोग यशस्वी; सुरगाणा तालुका कोरोनामुक्त - corona news

नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार केला होता. मार्च,एप्रिल या दोन महिन्यात नाशिक शहरासह जिल्ह्यातील लाखो नागरिकांना कोरोनाची लागण झाली. हजारो रुग्णांचा मृत्यू झाला. एकीकडे नाशिक शहरात ज्या पटीने रुग्ण संख्या वाढत होती. तेवढेच नाशिक जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये कोरोना रुग्ण आढळून येत होते. याकाळात जिल्हा प्रशासनाला देखील धावपळ करावी लागली. आदिवासी भाग असलेल्या सुरगाणा तालुक्यात स्थानिक आमदार,जिल्हा परिषद आणि आयुर्वेद तज्ञ यांच्या पुढाकाराने या भागातील कोरोना रुग्णांवर आयुर्वेद पद्धतीने उपचार करण्यात आले.

सुरगाणा तालुका कोरोनामुक्त
सुरगाणा तालुका कोरोनामुक्त

By

Published : Jun 29, 2021, 1:29 PM IST

नाशिक - नाशिक जिल्ह्याचे काही तालुके कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत आहेत. आदिवासी भाग असलेला सुरागाणा आणि पेठ तालुका कोरोनामुक्त झाला आहे. या भागात राबविलेल्या आयुर्वेद उपचाराचा प्रयोग यशस्वी झाल्याचं वैद्य विक्रांत जाधव यांनी ईटीव्ही भारताला दिलेल्या विशेष मुलाखतीत म्हटलं आहे.

आयुर्वेद उपचाराचा प्रयोग यशस्वी
नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार केला होता. मार्च,एप्रिल या दोन महिन्यात नाशिक शहरासह जिल्ह्यातील लाखो नागरिकांना कोरोनाची लागण झाली. हजारो रुग्णांचा मृत्यू झाला. एकीकडे नाशिक शहरात ज्या पटीने रुग्ण संख्या वाढत होती. तेवढेच नाशिक जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये कोरोना रुग्ण आढळून येत होते. याकाळात जिल्हा प्रशासनाला देखील धावपळ करावी लागली. आदिवासी भाग असलेल्या सुरगाणा तालुक्यात स्थानिक आमदार,जिल्हा परिषद आणि आयुर्वेद तज्ञ यांच्या पुढाकाराने या भागातील कोरोना रुग्णांवर आयुर्वेद पद्धतीने उपचार करण्यात आले. विशेष या उपचार पद्धतीला रुग्णांनी देखील चांगला प्रतिसाद दिल्याने आज सुरगाणा तालुक्याने पहिल्या टप्यात कोरोनामुक्त झाला आहे.अफवांचे पेवनाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असतांना दुसरीकडे सुरगाणा तालुक्यात अफवांचे पेव फुटले होते. आदिवासी बांधवांच्या लोकप्रतिनिधींनी बोगस डॉक्टर विरोधात आवाज उठवल्या होता. त्यानंतर आदिवासी बांधवांचा डॉक्टरांवरील विश्वास कमी होतं गेला. डॉक्टर सर्वच रिपोर्ट पॉझिटिव्ह देत असल्याची अफवा पसरल्याने कोरोनाचे लक्षण असून सुद्धा रुग्ण घरातच राहू लागली. त्यामुळे दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांची गर्दी कमी झाली होती. यामुळे रुग्ण संख्या वाढीसोबत मृत्यू देखील वाढतं गेले. पाड्यावर येणाऱ्या तपासणी साठी येणाऱ्या आरोग्य पथकाला नागरिक हाकलून लावत होते.

सुरगाणा पॅटर्न
आदिवासी बांधवांचा डॉक्टरांवरील उपचार पद्धतीवर विश्वास कमी होत चालला आहे. स्थनिक आमदार नितीन पवार यांनी प्रसिद्ध वैद्य विक्रांत जाधव यांची भेट घेतली. जाधव यांनी देखील आमदार पवार यांना रुग्णांना मोफत आयुर्वेद उपचार देण्याचं मान्य केले. मात्र, त्यांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेची मदत घेतली. जिल्हा परिषद सीईओ लीना बनसोड यांनीही आयुर्वेदाचा आदिवासी बांधवाना फायदा होईल या हेतूने त्यांना मदत करण्याचं आश्वासन दिले. या मोहिमेला सुरवात झाली. कोरोना झाल्यावर गावातील लोकं काय म्हणतील अशी भीती आदिवासी बांधवांमध्ये होती. मात्र, आयुर्वेदिक उपचाराबाबत आदिवासी बांधवामध्ये आस्था,आपुलकी आणि विश्वास असल्याने डॉक्टर आणि वैद्य जाधव यांनी एकत्रित संवाद साधला. प्रत्येक रुग्णांना त्याच्या लक्षणांप्रमाणे उपचार केले. दिवसाआड त्याची तब्येत सुधारते की नाही हे बघितले. हळूहळू याचा फायदा रुग्णांना होत गेल्याने कोरोनामुक्तीचे प्रमाण आणि मृत्यूचे प्रमाण देखील कमी होतं गेलं.आणि पुन्हा आदिवासी बंधनाचा डॉक्टरांवरील विश्वास वाढत गेला. डॉ. जाधव यांनी रोज व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे 60 ते 70 रुग्णांना तपासून त्यांच्यावर उपचार केले आणि आज चार महिन्यानंतर सुरगाणा तालुका कोरोनामुक्त झाला.पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सुरगाणा पॅटर्नचं कौतुक करत इतरही अदिवासी भागात आयुर्वेदिक उपचार पद्धती राबवण्याच्या सूचना दिल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details