महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाशी दोन हात करण्यासाठी जनजागृती मोहीम - कोरोना जनजागृती मोहीम

सध्या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. मनमाड, नांदगांवसह नाशिकच्या ग्रामीण भागात देखील कोरोनाबाबत भीती निर्माण झाली आहे. लोकांमध्ये निर्माण झालेली भीती दूर करण्यासाठी नांदगाव ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर रस्त्यावर उतरले आहेत.

nashik
कोरोनाशी दोन हात करण्यासाठी जनजागृती मोहीम

By

Published : Mar 11, 2020, 12:37 PM IST

नाशिक - जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोनाची ग्रामीण भागातही भीती पसरली आहे. कोरोनाविषयी जनजागृती करण्यासाठी शासकीय डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असुन घाबरू नका सामना करा, काळजी घ्या, अशा आशयाची पत्रक वाटून जनजागृती करत आहेत.

कोरोनाशी दोन हात करण्यासाठी जनजागृती मोहीम

सध्या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. मनमाड, नांदगांवसह नाशिकच्या ग्रामीण भागात देखील कोरोनाबाबत भीती निर्माण झाली आहे. लोकांमध्ये निर्माण झालेली भीती दूर करण्यासाठी नांदगाव ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर रस्त्यावर उतरले आहेत. युवा फाउंडेशन या सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन डॉ. रोहन बोरसे आणि त्यांचे सहकारी शहरातील गल्लीबोळात फिरून जनजागृती करत आहेत.

हेही वाचा -बाभळीच्या झाडावर पॅराशूट कोसळल्याने जवान जखमी

घाबरू नका, सामना करा...घाबरू नका, पण काळजी घ्या, असे सांगत कोरोनाबाबत जनजागृती करीत आहे. कोरोना आणि त्याच्यापासून बचाव कसा करावा याची माहिती देणारी पत्रके डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्ते शहरात वाटत आहेत.

हेही वाचा -मुलाच्या पहिल्या वाढदिवसासाठी गावी आलेल्या जवानाचा अपघातात मृत्यू

कोरोनोची संपूर्ण जगाने धास्ती घेतली असुन कोरोनोच्या उपचारासाठी वेळ लागतो. त्यामुळे आपण आधीच काळजी घ्यावी जेणेकरून कोरोनोला न घाबरता त्याचा सामना करण्याची हिंमत नागरिकांना मिळावी. या हेतूने युवा फाऊंडेशन आणि ग्रामीण रुग्णालयाच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details