महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ग्रामपंचायत राज्य विभाग जिल्हा व तालुकास्तरावर पुरस्कार मिळालेली अवनखेड ग्रामपंचायत बिनविरोध - अवनखेड ग्रामपंचायतींची निवडणूक

दिंडोरी तालुक्यातील अवनखेड ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली असून सदर ग्रामपंचायतीस राज्य विभाग जिल्हा व तालुकास्तरावर पुरस्कार मिळाले आहेत. आज अर्ज छाननी नंतर बिनविरोध निवड निश्चित होताच फटाके फोडत गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला.

Avankhed Gram Panchayat election unopposed
अवनखेड ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध

By

Published : Jan 1, 2021, 1:35 PM IST

दिंडोरी ( नाशिक ) : दिंडोरी तालुक्यातील आदर्श संसद ग्राम योजनेत देशातील दहा ग्रामपंचायतीत समाविष्ट असलेल्या अवनखेड ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली असून सदर ग्रामपंचायतीस राज्य विभाग जिल्हा व तालुकास्तरावर पुरस्कार मिळाले आहेत. लोकमत राज्यस्तरीय सरपंच अवॉर्डने सन्मानित व गेली पंधरा वर्ष सरपंच असलेल्या भाजप तालुकाध्यक्ष नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली सदर निवडणूक बिनविरोध झाली आहे .

ग्रामपंचायत निवडणूकीच्या नामनिर्देशन भरण्याच्या शेवटच्या दिवशी अवनखेड गावाने संमती दिलेल्या उमेदवारांनी नऊ जागांसाठी नऊ अर्ज दाखल केले. त्यामुळे बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. बिनविरोध निवडीमध्ये सरपंच नरेंद्र कोंडाजीराव जाधव, मंगेश विष्णू जाधव, रघुनाथ रुंजा गांगुर्डे, विनायक काशिनाथ निकम, कल्पना रमेश जाधव, मंदाबाई काळू लांडे, अलका साहेबराव बोरस्ते, अर्चना पोपट पिंगळ, भारती किरण पवार यांचा समावेश आहे.

अवनखेड ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध

निवडीचे सर्वत्र अभिनंदन

या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. आज अर्ज छाननी नंतर बिनविरोध निवड निश्चित होताच फटाके फोडत गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला. याप्रसंगी गुलाब पिंगळ, त्र्यंबक पिंगळ, चंद्रकांत जाधव, विश्‍वनाथ जाधव, सतिश निकम, प्रतिक पाटील, रंगनाथ जाधव, विष्णू मोरे, अशोक शिंदे, बाळासाहेब पिंगळ, नंदू मोरे,नंदु पिंगळ, भिकाजी शिंदे आदी उपस्थित होते.

हेही वाचा - स्वागत २०२१ : बॉलिवूडचे हे चित्रपट करणार बॉक्स ऑफिसवर धमाका

अवनखेड ग्रामस्थांच्या सहकार्याने ग्रामपंचायत बिनविरोध झाली. सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो. सर्वांना विश्‍वासात घेऊन गावच्या विकासासाठी सदैव कटीबध्द राहु असे अवनखेड सरपंच नरेंद्र जाधव यांनी सांगीतले.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details