नाशिक : नाशिकराेड मध्यवर्ती कारागृहात हृदयविकाराच्या झटक्याने एका कैद्याचा मृत्यू झाला आहे. अतुल सुभाष पिठेकर (वय 19 वर्षे) असे मृत्यू झालेल्या कैद्याचे नाव आहे.
प्रसाद भालेराव खून प्रकरणी झाली होती अटक
नाशिक : नाशिकराेड मध्यवर्ती कारागृहात हृदयविकाराच्या झटक्याने एका कैद्याचा मृत्यू झाला आहे. अतुल सुभाष पिठेकर (वय 19 वर्षे) असे मृत्यू झालेल्या कैद्याचे नाव आहे.
प्रसाद भालेराव खून प्रकरणी झाली होती अटक
सिडको परिसरातील हॉटेल सोनाली जवळ २८ जुलै राेजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास प्रसाद भालेराव हा मित्रांसमवेत जेवण करायला गेला होता. यावेळी अनिल पिठेकर, निलेश दांडेकर यांच्यासोबत किरकोळ कारणावरून प्रसादचा वाद झाला हाेता. याचा राग मनात धरून पिठेकर व दांडेकर यांच्यासह चार ते पाच जणांनी हॉटेलबाहेरील शनी मंदिरासमोर प्रसादला मारहाण केली. त्याच्या डोक्यात फरशी टाकून खून केला. याप्रकरणी अंबड पोलिसांनी सर्व संशयितांना अटक केली होती. यातीलच संशयित अतुल सुभाष पिठेकर हा सुद्धा मध्यवर्ती कारागृहात प्रसाद खून प्रकरणी अटकेत होता.
अचानक हृदयविकाराचा झटका
रविवारी (22 ऑगस्ट) सकाळी अतुलची तब्येत अचानक बिघडली. त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला कारागृहातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. कारागृह रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अबिद अबू अत्तर यांनी पिठेकरला तपासून मृत घाेषित केले. या घटने प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, संशयिताचा कारागृहात मृत्यू झाल्याने नियमानुसार त्याचे शवविच्छेदन धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात केले जाणार आहे.