महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 13, 2019, 8:14 AM IST

Updated : Dec 13, 2019, 1:59 PM IST

ETV Bharat / state

नाशिकमध्ये एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला

नाशिकमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दररोज शहरात चोरीच्या घटना घडत आहेत. गुरुवारी शहरातील ॲपल फोनचे शोरूम फोडून ८० आयफोन, महागडे मनगटी घड्याळ असा सुमारे ७५ लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. या घटनेला २४ तासही झाले नाहीत, तोपर्यंत आज पुन्हा चोरट्यांनी चौक मंडई भागातील एक्सिस कंपनीचे एटीएम  फोडण्याचा प्रयत्न केला.

Nashik
नाशिकमध्ये एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला

नाशिक - नाशिकमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दररोज शहरात चोरीच्या घटना घडत आहेत. गुरुवारी शहरातील ॲपल फोनचे शोरूम फोडून ८० आयफोन, महागडे मनगटी घड्याळ असा सुमारे ७५ लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. या घटनेला २४ तासही झाले नाहीत, तोपर्यंत आज पुन्हा चोरट्यांनी चौक मंडई भागातील एक्सिस बँकेचो एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला.

पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी एक्सेस कंपनीचे एटीएम पहाटे फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा प्रयत्न फसला. चौक मंडईत असलेले हे एटीएम अत्यंत वर्दळीच्या ठीकाणी असून, चोरट्यांनी हे मशीन फोडल्याचा प्रयत्न करणं म्हणजे एक प्रकारे पोलिसांना आवाहन दिल्यासारखे आहे.

नाशिकमध्ये एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला

पोलीस आयुक्त म्हणून विश्वास नांगरे पाटील नियुक्त झाल्यानंतर सुरुवातीला काही प्रमाणत गुन्हेगारी कमी झाली होती. मात्र, गेल्या महिन्याभरापासून पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोकं वर काढले असून शहरात खून, अत्याचार, घरफोडी सारख्या घटना घडत आहेत. शहरातील सराईत गुन्हेगारांवर पोलिसांनी लक्ष ठेऊन शहरात पुन्हा एकदा कोंबिंग ऑपरेशन राबवावे अशी मागणी आता नागरीक करत आहेत.

Last Updated : Dec 13, 2019, 1:59 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details