महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एकतर्फी प्रेमातून तरुणीवर प्राणघातक हल्ला; लासलगाव परिसरातील घटना - dattnagar nashik

एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने तरुणीवर धारदार शस्त्राने वार केला आहे. या प्राणघातक हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली आहेत.

दत्तनगर येथील घटना

By

Published : Sep 7, 2019, 8:30 PM IST

नाशिक : लासलगाव-कोटमगाव या रस्त्यावरील दत्तनगर एका तरुणीच्या घरात घुसुन एका माथेफिरू तरुणाने धारदार शस्त्राने वार केल्याची घटना घडली. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली. एकतर्फी प्रेमातून युवतीवर हा प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे.

तरुतीवर प्राणघातक हल्ला

सतीश ढगे असे आरोपीचे नाव आहे. सतिशने रागाच्या भरात या तरुणीवर चाकूने तब्बल 18 वार केले. यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर नाशिकच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. त्यामुळे ती मृत्यूशी झुंज देत आहे. तरुणीवर हल्ला केल्यानंतर सतीश ने स्वतःवर ही चाकूने वार केला. त्यामुळे तो देखील गंभीर जखमी झाला आहे. त्याला पोलिसांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

तरुण-तरुणी हे दोघेही एकाच कॉलेजमध्ये बारावीत शिकत होते. सतीशने एकतर्फी प्रेमातून हल्ला केला असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक एस.के.पांढरे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details