महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

land dispute case : जामीन वादा प्रकरणी तत्कालीन पोलीस अधीक्षकासह सात जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा - Nashik Land Dispute Case

नाशिकमध्ये जामीन वादा प्रकरणी तत्कालीन पोलीस अधीक्षकासह सात जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात ( Nashik Land Dispute Case ) आला. पोलीस अधीक्षक सचिन पाटील, मनसेचे पदाधिकारी डॉ प्रदीप पवार, इगतपुरी तहसीलदार परमेश्वर कासुळे, वाडीवरे पोलीस निरीक्षक अनिल पवार यांचा समावेश आहे.

land dispute case
तत्कालीन पोलीस अधीक्षकासह सात जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा

By

Published : Dec 1, 2022, 2:19 PM IST

नाशिक : जमिनीच्या वादात मदत न केल्याचा वचपा काढण्यासाठी नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार घडला ( Nashik Land Dispute Case ) आहे. संगनमताने गुन्हा नोंदवून जातीवाचक शिवीगाळा केल्याच्या आरोपाखाली तात्कालीन पोलीस अधीक्षक सचिन पाटील, मनसेचे पदाधिकारी डॉ प्रदीप पवार,इगतपुरी तहसीलदार परमेश्वर कासुळे,वाडीवरे पोलीस निरीक्षक अनिल पवार यांच्यासह एकूण सात जणांना विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला ( Atrocity case against Superintendent of Police ) आहे.

तत्कालीन पोलीस अधीक्षकासह सात जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा

नेमक प्रकरण :31 ऑगस्ट घडलेल्या घटनेप्रकरणी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आदेशाने बुधवारी पहाटे सव्वा तीन वाजता वाडीवरे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. एकाच वेळी पोलीस व महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. वाडीवरे येथील शेतकरी गोपाळ दगडू लहांगे यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, तत्कालीन पोलीस अधीक्षक सचिन पाटील व डॉ प्रदीप पवार यांना एका जमिनीच्या वादात मदत केली नाही. याचा वचपा काढण्यासाठी संशयित पाटील,डॉ पवार कासुळे, पोलीस निरीक्षक अनिल पवार,पुरवठा निरीक्षक भरत भावसार,पुरवठा अधिकारी बी आर ढोणे, पोलीस कर्मचारी प्रभाकर खांदवे यांनी संगनमत करून फिर्यादीच्या पत्नी विरोधात जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये वाडीवरे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक पवार यांनी जातीवाचक शिवीगाळ केली. पोलीस कर्मचारी खांदवेने फिर्यादीचा मुलगा सागर याला धक्काबुक्की करत धमकी देत हाकलून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी लहांगे यांनी नाशिकच्या अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयात तक्रार अर्ज केला होता. सदर अर्ज मंजूर करत न्यायालयाने गुन्हा नोंदवण्याचे निर्देश दिले होते. या आदेशाप्रमाणे अनुसूचित जाती व जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यान्वये गुन्हाची नोंद झाली (Atrocity case against seven person )आहे. गुन्ह्याचा तपास नाशिक ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ अर्जुन भोसले करत आहे.

तत्कालीन पोलीस अधीक्षकासह सात जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा

म्हणून गुन्हा दाखल केला :पाटील व डॉ पवार यांनी लहांगेवाडी येथे नातेवाईकांचे 40 एकर क्षेत्र घेतले आहे. ते आजही नातेवाईक कसत आहे. नवीन शर्तीचे क्षेत्र असल्याने नातेवाईकांच्या बाजूने उभे राहिल्याने डॉ पवार यांनी तत्कालीन पोलीस अधिक्षक पाटील यांना हाताशी धरून रेशनच्या काळाबाजार केल्याचा गुन्हा दाखल केला. पत्नी मुलाचा संबंध नसतांना त्यांना आरोपी केले. संबंधित शेती डॉ पवार आणि अधीक्षक पाटील यांच्या मामाच्या नावे खरेदी केली आहे. याआधारे कोर्टात अर्ज दाखल केला होता असे तक्रारदार गोपाळ लहांगे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details