नाशिक(दिंडोरी) -कसबे वणी-सापुतारा-सूरत महामार्गाचा पांडाणे येथील पर्यायी रस्ता वाहून गेल्याची बातमी ईटीव्ही भारतने प्रसिध्दी केली. याची दखल घेत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी या रस्त्याची पाहणी केली. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम त्वरित सुरू करण्याच्या सूचना त्यांनी संबंधीत ठेकेदाराला दिल्या. झिरवाळ यांच्या सोबत दिंडोरीचे तहसिलदार पंकज पवार, तालुका कृषी अधिकारी अभिजित जमधडे यांनीही या रस्त्यांची पाहणी केली.
ईटीव्ही भारत इम्पॅक्ट: वणी-सापुतारा-सुरत पर्यायी मार्गाची दुरुस्ती सुरू करा, विधानसभा उपाध्यक्षांचे आदेश - नरहरी झिरवाळ वणी-सूरत मार्ग पाहणी
दिंडोरी तालुक्यातील पांडाणे येथे वणी-सापुतारा-सुरत रस्त्याचे चौपदरी करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे नाशिक ते सुरत, शिर्डी ते सुरत या मार्गाने प्रवास करणाऱ्यांसाठी पर्यायी रस्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, सुरुवातीच्याच पावसात हा पर्यारी रस्ता वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती. ही बातमी ईटीव्ही भारतने प्रसिध्दी केली होती.
दिंडोरी तालुक्यातील पांडाणे येथे वणी-सापुतारा-सुरत रस्त्याचे चौपदरी करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे नाशिक ते सुरत, शिर्डी ते सुरत या मार्गाने प्रवास करणाऱ्यांसाठी पर्यायी रस्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, सुरुवातीच्याच पावसात हा पर्यारी रस्ता वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती. ही बातमी ईटीव्ही भारतने प्रसिध्दी केली होती. याबाबत विधानसभा उपाध्यक्ष तथा दिंडोरी-पेठचे आमदार नरहरी झिरवाळ यांना माहिती मिळताच त्यांनी या रस्त्याची पाहणी करत संबधीत ठेकेदारांना त्वरीत रस्ता दुरुस्तीच्या सुचना दिल्या. तसेच या ठिकाणच्या पुलाचे काम जलदगतीने करण्याचेही आदेश राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अधिकारी मनोज पाटील यांनी दिले. झिरवाळ यांचे आदेश मिळताच आज संबधीत ठेकेदारांनी जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरील मोरी आणि भरावाचे काम वेगात सुरू केले आहे.