महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Asha Worker Salary Stuck Nashik : ३ महिन्यापासून पगार न मिळाल्याने आशा सेविकांवर उपासमारीची वेळ.. - आशा सेविकांवर उपासमारीची वेळ

कोरोना काळात आरोग्य सेवकांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांचा गेल्या तीन महिन्यांचा पगार थकला ( Asha Worker Salary Stuck Nashik ) आहे. तसेच २१ महिन्यांचा प्रोत्साहन भत्ताही न मिळाल्याने त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला ( Time of starvation on Asha Sevikans ) आहे.

३ महिन्यापासून पगार न मिळाल्याने आशा सेविकांवर उपासमारीची वेळ..
३ महिन्यापासून पगार न मिळाल्याने आशा सेविकांवर उपासमारीची वेळ..

By

Published : Feb 4, 2022, 9:00 PM IST

येवला ( नाशिक ) : आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचा गेल्या २१ महिन्याचा २१ हजार रुपये कोरोना प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही. तसेच ३ महिन्यापासून पगारही मिळाला नसल्याने ( Asha Worker Salary Stuck Nashik ) येवला तालुक्यातील २१८ आशा स्वयंसेविका व आशा गटप्रवर्तक यांच्यावर उपासमारीची वेळ आली ( Time of starvation on Asha Sevikans ) आहे.

३ महिन्यापासून पगार न मिळाल्याने आशा सेविकांवर उपासमारीची वेळ..

घर कसे चालवावे असा प्रश्न

राज्यामध्ये कोरोना काळात घरोघरी जाऊन आशा सेविकांनी आपले कर्तव्य बजावूनदेखील कोरोना काळातील २१ हजार रुपये प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही. राज्यातील सर्व आशा स्वयंसेविकासह येवला तालुक्यातील आशा स्वयंसेविका तसेच आशा गटप्रवर्तक परिस्थिती सारखीच आहे. पालकमंत्री छगन भुजबळ ( यांच्या मतदार संघातील आम्ही असूनही आम्हाला कोरोना प्रोत्साहन भत्ता अजूनही मिळाला नाही. गेल्या तीन महिन्यापासून पगार देखील झाला नसल्याने आशा स्वयंसेविकानी घर कसे चालवावे असा प्रश्न पडला, असल्याची प्रतिक्रिया आशा सेविकानी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details