महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिकमध्ये कलाकारांनी एकत्र येत तिरंग्याला दिली मानवंदना - लेखक निषाद वाघ

नाशिकच्या जुने सिडको भागात नाटक तसेच चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्या नाशिकच्या कलाकारांनी एकत्र येत स्वातंत्रदिन साजरा केला. सर्वांनी एकत्र येत तिरंग्यास मानवंदना दिली.

नाशिकमध्ये कलाकारांनी एकत्र येत तिरंग्याला दिली मानवंदना

By

Published : Aug 16, 2019, 9:42 AM IST

नाशिक - शहरातील जुने सिडको भागात नाटक तसेच चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्या नाशिकच्या कलाकारांनी एकत्र येत स्वातंत्रदिन साजरा केला. सर्वांनी एकत्र येत तिरंग्यास मानवंदना दिली. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नाशिकच्या जुने सिडको भागात छत्रपती शिवाजी मार्केट शॉपिंग सेंटर येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. दरवर्षीप्रमाणे या कार्यक्रमाला नाशिकमधील नाटक, चित्रपट आणि कला क्षेत्रात काम करणारे कलाकार उपस्थित होते. यावेळी मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम करणाऱ्या सायली संजीव यांच्या हस्ते ध्वजारोहण करून तिरंग्यास मानवंदना देण्यात आली. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी एकत्र येत देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर करून देशाप्रती आपली भावना व्यक्त केली. यावेळी उपस्थित नागरीकांनी विद्यार्थ्यांच्या या नृत्याला भरभरून प्रतिसाद दिला.

नाशिकमध्ये कलाकारांनी एकत्र येत तिरंग्याला दिली मानवंदना

अभिनेत्री सायली संजीव, अभिनेता किरण भालेराव, प्रसिद्ध फोटोग्राफर प्रसाद पाटील, शीतल सोनवणे, संदीप सोनवणे, लेखक निषाद वाघ, किरण सोनार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details