मनमाड - नौकानयन (Rowing) स्पर्धेत देशाला सुवर्णपदक मिळवून देणारा तसेच अर्जुन पुरस्कार विजेता दत्तू भोकनळ सध्या शेतात काम करत आहे. त्याच्यावर ही वेळ का आली, त्याने तो आपले कर्तव्य बजावत असलेल्या भारतीय सैन्यदलाचाही राजीनामा का दिला आहे. त्याने मी महाराष्ट्रीयन असल्याने मला खुप त्रास दिला व माझी पात्रता असताना मला पात्रता फेरीतून बाद करत माझ्यापेक्षा जास्त वेळ लागणाऱ्याना ऑलिम्पिकमध्ये पाठवले. असा नौकानयन (रोइंग) फेडरेशनवर गंभीर आरोप केला आहे. याबाबत केंद्रीय मंत्री भारती पवार व पालकमंत्री छगन भुजबळ यांनी न्याय द्यावा अशी मागणी दत्तूने केली आहे.
माझ्यापेक्षा जास्त वेळ लागणाऱ्याना पात्रता फेरीत घेतले -
देशाला नौकानयन (Rowing) स्पर्धेत सुवर्णपदक मिळुन देणारा अर्जुन पुरस्कार विजेता रोइंगपटू दत्तू भोकनळ सर्वकाही सोडून सध्या शेती करत आहे. असे म्हटले, तर सहसा कोणालाही विश्वास बसणार नाही. मात्र हे खरे आहे. दत्तूवर ही वेळ का आली आहे याबाबत विचारले असता दत्तूने गंभीर आरोप केले आहेत. फेडरेशनने केवळ मी महाराष्ट्रीयन म्हणून माझ्यावर अन्याय केला आहे. असेही दत्तूचे म्हणणे आहे. माझ्यापेक्षा जास्त वेळ लागणाऱ्याना पात्रता फेरीत सहभागी करून घेतले असुन मला कोणतेही कारण न सांगता कॅम्पमधून काढून टाकले आहे.