नाशिक -ग्रामीण भागातील नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी अहिराणी भाषेमध्ये नागरिकांना लसीकरण करून घेण्याचे अनोख्या पद्धतीने आवाहन केले आहे.
अहिराणी भाषेत लसीकरण करून घेण्याची विनंती -
लसीकरण मोहीम ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर व्हावी म्हणून जिल्हा परिषदेच्यावतीने विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. मात्र, तरीही ग्रामीण भागातील लोकांमध्ये लसीकरणाविषयी संभ्रम असल्याने ग्रामीण भागातील लोक लसीकरण करून घेण्यासाठी पुढे येत नसल्याचे पाहून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी ग्रामीण भाषेत त्यांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या अहिराणी शैलीत आपुलकीने केलेल्या आवाहनाला आता तरी ग्रामीण भागातील लोक प्रतिसाद देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा - मराठा आरक्षणासाठी सर्व पक्षांनी एकत्र यावं, पवारांच्या भेटीनंतर संभाजीराजेंची प्रतिक्रिया