नाशिक - पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या भोंदुबाबाचे अनेक कारनामे समोर येत आहे. गणेश जगताप ह्या भोंदुबाबाने अनेकांची करोडो फसवणूक केले आहेत. त्याच्यावर जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे..
लॉकडॉऊन काळात इंदिरानगर परिसरातील एका आश्रमशाळेतील सामाजिक कल्याणकारी कामाच्या नावाखाली वृद्धाला 11 लाखांचा गंडा गणेश जगताप या भोंदुबाबाने घातला आहे. गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने मुंबई येथून शिताफीने शोध घेत बेड्या ठोकल्या आहेत.
पैशाच्या हव्यासापोटी गणेश जगताप हा भोंदुबाबा नागरिकांचा विश्वास संपादन करत होता. तुम्हाला जमिनीतून लाखो रुपये मिळतील असे सांगून त्यांना निखाऱ्यावर चालण्यास सांगणे तसेच भक्तांना चाबकाचे फटके देत होते. अशा प्रकारचे व्हिडीओदेखील निर्धास्तपणे सोशल मीडियावर टाकत असत. बाबा अघोरी प्रकार करण्यास सांगत असल्याने नागरीकदेखील पैशाच्या हव्यासापोटी त्याला लाख रुपये देत होते.
भोंदुबाबावर जादूटोणा कायद्यांतर्गत कारवाई करावी-