नाशिक -हनुमंतांचे जन्मस्थान अंजनेरी की किश्गिंदा हा वाद पेटला असून गोविंदानंद महाराजांविरोधात अंजनेरीतील गावकरी आक्रमक झाले आहे. गोविंदानंद महाराज यांनी अंजनेरी किल्ल्यावर येण्याचे ( Anjaneri Fort ) आव्हान ग्रामस्थांनी दिले आहे. गोविंदानंद महाराज ( Govindananda Maharaj ) यांनी कर्नाटकातिल किश्गिंदा पर्वत हनुमंताचे स्थान ( Location of Kishginda Mountain Hanumantha in Karnataka ) असल्याचा दावा केला असून त्यासाठी पुराव्यानिशी चर्चेची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे अंजनेरी गाम्रस्थ आक्रमक झाले आहे. अंजनेरीतील अंजनी माता मंदिरात गावकरी आणि साधूसंतांची बैठक झाली. अंजनेरी हेच जन्मस्थळ असून वेळ पडल्यास न्यायालयीन लढाई देखिल लढवण्याचा बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण? :नाशिकमधील अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थान असल्याचा दावा त्यांनी फेटाळून लावला आहे. महंत गोविंदानंद त्र्यंबकेश्वर येथे हनुमानाच्या जन्मस्थानावरील वैज्ञानिक पुरावे आणि दाव्यांवर चर्चा करण्यासाठी आले आहेत. त्यांनी धर्मग्रंथ, वेद आणि पुराणांच्या संदर्भात दाखले देऊन जन्मभूमीच्या दाव्यावर पुढे येऊन चर्चा करण्याचे आवाहन त्यांनी केले. महंत गोविंददास सरस्वती यांनी एकप्रकारे नाशिकच्या संत महंतांना अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थान असल्याचे सिद्ध करण्याचे आव्हान दिले आहे. किश्गिंदा मठाधिपतीने हनुमानाचे जन्मस्थान अंजनेरी नसून किश्गिंदा असल्याचा दावा केला आहे. नाशिकमधील महंत आणि साधू यांचे मात्र त्यांच्या जन्मस्थानापेक्षा वेगळे मत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी शृंगेरी, द्वारका येथील शंकराचार्य आणि रामजन्मभूमी ट्रस्टच्या उपासकांचीही भेट घेतली आणि 20-20 दिवस या विषयावर चर्चा केली. त्यांची संमती मिळाली, गुजरातमधील डांग जिल्ह्यातील डोंगर, नाशिकमधील अंजनेरी, कर्नाटकातील किश्गिंदा किंवा हरियाणातील काही ठिकाणी हनुमानाचा जन्म झाल्याचा दावा केला जात होता. आंध्र प्रदेशातील तिरुपती देवस्थानच्या माध्यमातून विकसित होत असलेल्या हनुमान जन्मभूमीचे प्रकरण थेट न्यायालयात गेले असताना, न्यायालयाच्या आदेशानुसार तिरुपती देवस्थानने एक पाऊल मागे घेतले आहे.