नाशिक - जिल्ह्यात पिंपळगावमधील इंदिरानगर भागात काल (दि. 16) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास साहिल शेख हा तरुण आपल्या मित्रासोबत भररस्त्यात वाढदिवस साजरा करत होता. याच वेळी तेथून कारने जाणाऱ्या चेतन बाळू बैरागी (वय 30) या युवकाने गाडीचा हॉर्न वाजवल्याचा राग आल्याने वाढदिवसाला जमलेल्या टोळक्याने हल्ला करत चेतनचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. याबाबत लासलगाव पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सहा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
भाईचा बर्थ डे रस्त्यावर, कारचा हॉर्न वाजवल्याचा रागातून टोळक्याने केला युवकाचा खून.. - murder by blowing the horn
रस्त्यावर वाढदिवस सुरू असताना हॉर्न वाजवणाऱ्या युवकाचा जमावाने खून केल्याची घटना नाशिक जिल्ह्यात घडली आहे. याबाबत लासलगाव पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सहा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, चेतन बाळू बैरागी आणि आकाश शेजवळ हे आपल्या कारने घरी जात असताना साहिल इमरान शेख हा भररस्त्यात आपला वाढदिवस साजरा करीत होता. त्यामुळे तेथे गर्दी झाल्याने फिर्यादी आकाश यांनी कारचा हॉर्न वाजवला. त्याचा वाढदिवसासाठी जमलेल्या टोळक्याला राग येऊन त्यांनी गाडी चेतन आणि आकाश यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. साहिल इम्रान शेख याने चाकूने आकाश शेजवळच्या कमरेच्या डाव्या बाजूस व मांडीवर वार केले. त्यावेळी चेतन बैरागी हा आकाशच्या मदतीला येत असताना साहीलसह फिरोज अकबर शहा, राजू राजूळे, काळू लहाने, दत्तू जाधव, इम्रान सलीम सैय्यद, कृष्णा वर्षे, रोहीत शिरसाठ, अरुण माळी व इतर दोन ते तीन जणांनी चेतनला जबर मारहाण केली. नंतर साहिलने बैरागी याच्या पोटात चाकूने वार करून त्याचा खून केला. या प्रकरणी पोलिसांनी 6 संशयितांना ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.