नाशिक: नाशिकच्या गंजमाळ झोपडपट्टी येथे गेल्या काही महिन्यापासून महापालिकेच्या वतीने गटारीचे काम अधर्वट सोडण्यात आहे. त्यामुळे इथे घुशींचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. अशात या भागात बबाबाई गायखे या वयोवृद्ध महिला एकट्याच झोपडीत राहत होत्या. (27 एप्रिल) बुधवारी रात्री गायखे या वृद्ध महिला झोपेत असताना गटारीतून येणाऱ्या घुशीने त्याच्या हाताला कुरतडण्यास सुरवात केली, मात्र वयोमानामुळे प्रयत्न करून गायखे या घुशीला हाकलून लावू शकल्या नाही. घुशीने रात्रभर त्यांच्या तळहातापासून मनगटापर्यंतचा हात कुरतुडून त्यांना रक्तबंबाळ केले. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील आरोग्य सेवक दीपक डोके यांच्या मदतीने गायखे यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले, परंतु दुर्दैवाने त्या आजींचा आज दुपारी मृत्यू झाला आहे.
Rat Bitting Woman : धक्कादायक; घुशीने हात कुरतडल्याने वयोवृद्ध महिलेचा मृत्यू - Rat Biting Womans Claw
नाशिकच्या गंजमाळ झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या एका वयोवृद्ध महिलेचा घुशीने हाताचा पंजा कुरतडल्याने तिच्या दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या परिसरात महानगरपालिकेकडून गटारीचे अर्धवट काम सोडण्यात असल्याने, या भागात मोठ्या प्रमाणात घुशी फिरत आहेत. यातून या वृद्ध महिलेला आपला जीव गमावा लागल्याची भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
अनेक महिन्यांपासून काम अर्धवट: नाशिक महानगरपालिकेने एक वर्षापूर्वी गंजमाळ झोपडपट्टी परिसरातील रस्त्याच्या काँक्रिटीकरणचे काम सुरू केले, मात्र आज वर्ष होऊनही काम पूर्ण झाले नाही. हे काम अर्धवट असल्यामुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. रस्ता खोदून ठेवल्याने अपघात होतात, तसेच आरोग्याचा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत महानगरपालिकेला विचारल असता कॉन्ट्रॅक्टरला काम दिले आहे असे सांगतात. कॉन्ट्रॅक्टरला विचारले तर दोन-चार दिवसात काम करतो म्हणून तोही उडवा उडवीचे उत्तर देतोय. गरिबांकडे बघायला कुणाला वेळ नाही असे येथील नागरिकांनी म्हटले.
फक्त मतदानासाठी येथील नागरिकांचा वापर: गंजमाळ झोपडपट्टीत अनेक समस्या, अडचणी या इथल्या लोकांसमोर आहेत. खरंतर सामान्यांतील सामान्यांच्या वाटेला असे दुर्दैवी जगणे येणे यापेक्षा वाईट काहीच नाही. सत्तेच्या राजकारणात अनेकदा गरीब माणूस भरडला नाही तर ठेचला जातो. कित्येक समस्यांना तोंड देत या वस्तीतील लोक आपले रोजच जीवन जगात आहे. अशा दुर्लक्षित केलेल्या या वस्तींना अस्वच्छतेचा ठप्पा देखील हि सुशिक्षित मंडळी लावतात. वस्तीतील अनेक प्रश्न ऐरणीवर असताना, येथील नगरसेवक हे ठराविक काळात त्यांची मदत करून आपला स्वार्थ साधतात. इतरवेळी कोणालाही या लोकांच्या जीवनाशी काहीही संबंध नसतो. खेदाची गोष्ट म्हणजे या लोकांच्या समस्या या देखील कोणाला ऐकून घ्यायच्या नसतात.अनेकदा वस्तीतील प्रश्न संबंधित लोकांकडे मांडलेही जातात परंतु वस्तीतील लोकांकडे निवडणुकीपुरतेच लक्ष दिले जाते, अशी खंत आरोग्य सेवक दीपक डोके यांनी व्यक्त केली.
हेही वाचा:Nashik Crime सहा महिन्यांच्या बालिकेचा मृतदेह सापडल्याने खळबळ नरबळीचा संशय