नाशिक- रस्त्याने पायी चालत असलेल्या भिकाऱ्याला एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या जवळील पाणी बॉटल आणि मास्क देऊन माणुसकीचे दर्शन घडवले आहे. हा प्रसंग येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील टोलनाक्यावर घडला. संतोष बागूल असे मदत करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
खाकीतील माणुसकी.! येवल्यात संचारबंदी दरम्यान गरजूला 'अशी' केली मदत - police gave Beggar mask
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू झाली आहे. शहरात येणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून तपासणी केली जात आहे. पोलीस कर्मचारी सतीश बागूल हे देखील पिंपळगाव जलाल येथील टोल नाक्यावर कर्तव्य बजावत होते. या दरम्यान, बागूल यांना रस्त्याने पायी चालत असलेला भिकारी दिसून आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू झाली आहे. शहरात येणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून तपासणी केली जात आहे. पोलीस कर्मचारी सतीश बागूल हे देखील पिंपळगाव जलाल येथील टोल नाक्यावर कर्तव्य बजावत होते. या दरम्यान, बागूल यांना रस्त्याने पायी चालत असलेला भिकारी दिसून आला. त्यानंतर बागूल यांनी भिकाऱ्याजवळ जाऊन त्याला आपल्या जवळील पाणी बॉटल व मास्क दिले आणि त्याच्या तब्येतीची विचारपूस केली. नंतर बागूल यांनी भिकाऱ्याला हात जोडून स्वतःची काळजी घेण्यास सांगितले. बागूल यांची ही कृती कौतुकास्पद असून ती सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.