महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज ठाकरे भाजपच्या गोबेल्स प्रचाराचा बुरखा फाडतायेत, हे कौतुकास्पद - डॉ. अमोल कोल्हे - bjp nashik

राज ठाकरे हे भाजपच्या गोबेल्स (हिटलरचा प्रचारमंत्री जोसेफ गोबेल्स याची प्रचाराची निती) प्रचाराचा बुरखा फाडतायेत, ही कौतुकाची बाब आहे, असे मत डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.

डॉ अमोल कोल्हे

By

Published : Apr 26, 2019, 3:44 PM IST

नाशिक - राज ठाकरे हे भाजपच्या गोबेल्स (हिटलरचा प्रचारमंत्री जोसेफ गोबेल्स याची प्रचाराची निती) प्रचाराचा बुरखा फाडतायेत, ही कौतुकाची बाब आहे, असे मत डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले. नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचार रॅलीसाठी आले असता, ते ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीशी बोलत होते.

ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीशी बोलताना अमोल कोल्हे

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्यात आज नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या रॅलीसाठी शिरूर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे सहभागी झाले होते. त्यांच्या उपस्थितीत नाशिकच्या लेखानगर, सिडको, महात्मा नगर, कॉलेज रोड, सीबीएस, अशोक स्तंभ, पंचवटी आडगाव नाका आदी भागातून रॅली काढण्यात आली. यावेळी डॉ. कोल्हे यांचे ठीक- ठिकाणी स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार समीर भुजबळ यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज ठाकरे हे भाजपच्या गोबेल्स प्रचाराचा बुरखा फाडत आहेत. ते दूध का दूध पाणी का पाणी करत असल्याने ही कौतुकास्पद असल्याचे डॉ. कोल्हे यांनी म्हटले आहे. २०१४ ते २०१९ ह्या पाच वर्षात भाजपने दिलेले आश्वासने कुठलीच पाळली नसल्याचे ते म्हणाले. ६२ टक्के शेतकरी असलेल्या भारत देशातील शेतकऱ्यांचे कुठलेच प्रश्न सुटले नसून, २ कोटी रोजगार देणार असे म्हणणाऱ्या भाजपच्या काळात ६५ हजार तरुणांच्या नोकऱ्या गेल्याचेही कोल्हे म्हणाले. पंतप्रधान आपल्या सभेतून शरद पवार यांच्यावर वैयक्तिक टीका करतात म्हणजे त्यांना जाणवले आहे, की देशात सत्तांतर होणार असून शरद पवार हे त्यासाठी महत्वाचे कारण असणार आहेत. तसेच नाशिक मध्ये भुजबळांनी केलेल्या कामाबाबत देखील डॉ. अमोल कोल्हे यांनी कौतुक केले.

ABOUT THE AUTHOR

...view details