मनमाड (नाशिक) - शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून आज महावितरण कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे महावितरण कार्यालयाल बंद करण्यात आले असून वीज वितरण सोडून सर्व सुविधा बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे इतर कामे ठप्प पडली आहेत.
नाशिक जिल्ह्यातील क्रमांक तीनचे शहर म्हणून ओळख असणाऱ्या मनमाड जंक्शनमध्ये जवळपास सव्वा लाखाच्यावर लोकसंख्या आहे. शासनानेदेखील विशेष काळजी म्हणून येथे लक्ष घातले आहे. सुरुवातीला अगदी नगण्य असणाऱ्या शहरात आज कोरोनाचे 94 च्या वर रुग्ण आहेत. कोरोनामुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या शहरात अचानक रुग्णांची संख्या वाढण्यास सुरवात झाली आहे. त्यात शहरातील महावितरण कंपनीच्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कार्यालय बंद करण्यात आले आहे.