महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिकमधील ऐतिहासिक मंदिरे पाडव्याच्या मुहूर्तावर खुली होणार

गेल्या आठ महिन्यांपासून कोरोनामुळे बंद असलेली महाराष्ट्रातील सर्व मंदिरे उद्या पाडव्याच्या मुहूर्तावर उघडणार आहेत. आज दुपारी महाराष्ट्र शासनाचा मंदिरे उघडण्याबाबतचा अध्यादेश प्राप्त झाला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व मंदिरांचे सॅनिटाईजेशन आणि साफ-सफाई करण्याचे काम सुरू असून सर्वत्र आनंदाचे, उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.

नाशिक
नाशिक

By

Published : Nov 15, 2020, 8:02 PM IST

नाशिक- गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेली राज्यातील मंदिरे उद्यापासून दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सुरू होत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरे पुन्हा सुरू करण्याची घोषणा केल्याने भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी लागू झाल्यापासून राज्यातील सर्व मंदिरे कुलूप बंद होती.

नाशिकमधील ऐतिहासिक मंदिरे पाडव्याच्या मुहूर्तावर खुली होणार
नाशिकमधील सप्तशृंगी मंदिर, श्री त्रंबकेश्वर मंदिर, श्री काळाराम मंदिर, कपालेश्वर मंदिर ही सर्वच मंदिरे भाविकांना दर्शनासाठी उद्यापासून खुली होणार आहेत. यामुळे आज नाशिकच्या कपालेश्वर मंदिरात स्वच्छता करण्यात आली. तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांना धरूनच मंदिर प्रशासनही काम करणार आहे.

महाराष्ट्र शासनाचा मंदिरे उघडण्याबाबतचा अध्यादेश

गेल्या आठ महिन्यांपासून कोरोनामुळे बंद असलेली महाराष्ट्रातील सर्व मंदिरे उद्या पाडव्याच्या मुहूर्तावर उघडणार आहेत. आज दुपारी महाराष्ट्र शासनाचा मंदिरे उघडण्याबाबतचा अध्यादेश प्राप्त झाला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व मंदिरांचे सॅनिटाईजेशन आणि साफ-सफाई करण्याचे काम सुरू असून सर्वत्र आनंदाचे, उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.

नाशिक हे सिंहस्थ कुंभमेळ्याचे प्रधान स्थान असून नाशिकमध्ये मोठ्या संख्येने भाविक येत असतात. कोरोनाच्या काळात मंदिर सुरू होत असून देवस्थानची जबाबदारी वाढली आहे. मंदिरात दर्शनसाठी आलेल्या भाविकांचे तापमान तपासणे, त्यांचे सॅनिटाईजेशन करणे, भाविकांना थोड्या-थोड्या अंतराने आत सोडणे, हे सर्व नियम पाळण्यात येणार असल्याचे निर्वाणी आखाड्याचे मंहत सुधीरदास महाराज यांनी सागितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details