नाशिक - कोरोनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने राज्यातील सर्व शहरांमध्ये असलेल्या सार्वजनिक ठिकाणांवर गर्दी होऊ नये म्हणून जमावबंदी लागू केली आहे. शहरातील सर्वच गजबजलेली ठिकाणे सध्या ओस पडली आहेत. दरम्यान, सरकारच्या या निर्णयाला पाठिंबा दर्शवत जिल्ह्यातील सुप्रसिद्ध आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री काळाराम मंदिर, श्री त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर आणि साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धशक्तीपीठ असलेले सप्तशृंगी माता मंदिर बुधवरपासुन ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाच्यावतीने घेण्यात आला आहे.
कोरोना इफेक्ट; जिल्ह्यातील प्रमुख मंदिरे 31 मार्चपर्यंत राहणार बंद
कोरोनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने राज्यातील सर्व शहरांमध्ये असलेल्या सार्वजनिक ठिकाणांवर गर्दी होऊ नये म्हणून जमावबंदी लागू केली आहे.
जिल्ह्यातील प्रमुख मंदिरे 31 मार्चपर्यंत राहणार बंद
कोरोनाचे सावट दूर होईपर्यंत भाविकांना श्री काळाराम मंदिर, श्री त्रंबकेश्वर मंदिर आणि श्री आदिमाया सप्तशृंगी देवीचे दर्शन घेता येणार नाही. मात्र, असे असले तरीही या मंदिरातील दैनंदिन पूजाविधी परंपरेप्रमाणे आणि विधिवत पार पडतील, असेदेखील मंदिर प्रशासनाने यावेळी स्पष्ट केले आहे.