नाशिक -भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्ष चतुर्थीला देशभरात गणपती बाप्पांची स्थापना होते. तीन दिवसानंतर महालक्ष्मी म्हणजे गौरीचे आगमन होते. गौरींच्या प्रतिष्ठापणेसाठी लागणाऱ्या साड्या, अलंकार, मिठाई खरेदीसाठी नाशिकमधील बाजार पेठेत महिलांची लगबग पाहायला मिळत आहे.
गौरी-गणपतीचा सण महाराष्ट्रात मोठ्या श्रद्धेने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. गौरींना माहेरवाशीण समजले जाते. पहिल्या दिवशी आपापल्या परंपरेनुसार घराच्या उंबऱ्यातून गौरी घरात आणल्या जातात.