महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिकातील मंदिरे राहणार बंद; प्रशासनाचा निर्णय

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील सर्व देवस्थाने बंद ठेवण्यात आली आहेत. सर्व मंदिर प्रशासनाच्यावतीने हा निर्णय घेण्यात आला. जोपर्यंत कोरोनाचे सावट दूर होत नाही तोपर्यंत भाविकांना मंदिरांमध्ये जाता येणार नाही.

Kalaram Temple
काळाराम मंदिर

By

Published : Mar 18, 2020, 11:32 AM IST

नाशिक - कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य शासनाच्यावतीने सार्वजनिक ठिकाणांवर कलम 144 लावण्यात आले आहे. त्यामुळे नाशिक शहरातील सर्वच गजबजलेली ठिकाणे आणि मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत.

नाशिकातील मंदिरे राहणार बंद

हेही वाचा -जोतिबाची चैत्र यात्रा रद्द; कोल्हापूरातील मंदिर, मशीद, चर्चसुद्धा दर्शनासाठी बंद

नाशिक जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले काळाराम मंदिर, त्र्यंबकेश्वर मंदिर आणि साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धशक्तीपीठ असलेले सप्तशृंगी मंदिर आजपासून ३१मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व मंदिर प्रशासनाच्यावतीने हा निर्णय घेण्यात आला. जोपर्यंत कोरोनाचे सावट दूर होत नाही तोपर्यंत भाविकांना मंदिरांमध्ये जाता येणार नाही. मात्र, मंदिरांतील दैनंदिन पूजाविधी परंपरेप्रमाणे सुरू राहणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details