महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर नाशकातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मिसळवर मारला ताव

नेत्यांनो कार्यकर्तेदेखील काही कमी नाहीत, तुम्ही जसे सोयीनुसार एकत्र येतात तसे आम्हीदेखील एकत्र येऊ शकतो, असे नाशिकमधील कार्यकर्त्यांनी नेत्यांना दाखवून दिले आहे. मिसळ पार्टीला कार्यकर्त्यांचा नेत्यांना पडलेला विसर यासाठी कार्यकर्त्यांनी मिसळ पार्टीतून चोख उत्तर दिले

By

Published : May 3, 2019, 8:17 PM IST

सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मिसळवर मारला ताव

नाशिक- निवडणुकीचा धुरळा शांत बसतो न बसतो तोच सर्वपक्षीय उमेदवार आणि नेते मंडळी मांडीला मांडी लावून मिसळवर ताव मारताना दिसले. या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल आणि ट्रोल होत आहेत. कार्यकर्त्यांनी या मिसळ पार्टीचे आयोजन करत सर्वपक्षीय नेत्यांना आम्हीही कायमचे शत्रु नाही, असे दाखवून दिले आहे.

निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर नाशकातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मिसळवर मारला ताव

नाशिक मिसळ आणि त्या ठिकाणी होणाऱ्या वेगळ्या चर्चा सर्वश्रुत आहेत. त्यातच भर पडली ती निवडणूकीनंतरच्या सर्वपक्षीय उमेदवार आणि नेते मंडळींच्या मिसळपार्टीची. आरोप-प्रत्यारोप हे निवडणुकीपुरतेच मर्यादित असतात त्यानंतर शहराच्या विकासासाठी आणि नातेसंबंध जोडण्यासाठी आम्ही एकत्र आल्याचे नेत्यांनी सांगितले होते.

राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो, असे नेहमीच नेत्यांकडून सांगितले जाते. परंतु कार्यकर्त्यांमध्ये हे कधीच पाहायला मिळत नाही, मात्र नाशिकमधील कार्यकर्त्यांनी प्रगल्भ मिसळ पार्टीचे आयोजन करत एक नवीन ट्रेंड सुरू केला आहे. शाम गोहाड यांनी या मिसळ पार्टीचे आयोजन केले आहे.

नेत्यांनो कार्यकर्तेदेखील काही कमी नाहीत, तुम्ही जसे सोयीनुसार एकत्र येतात तसे आम्हीदेखील एकत्र येऊ शकतो, असे नाशिकमधील कार्यकर्त्यांनी नेत्यांना दाखवून दिले आहे. मिसळ पार्टीला कार्यकर्त्यांचा नेत्यांना पडलेला विसर यासाठी कार्यकर्त्यांनी मिसळ पार्टीतून चोख उत्तर दिले आहे. नेत्यांना कोणता झेंडा घेऊ, असे म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत प्रगल्भ मिसळ पॅटर्न सुरू केला आहे. तर तर्रीदार मिसळीवर ताव मारत आमच्या शिवाय नेते पुढे कसे जाणार, असा सवाल उपस्थित करत नेते मंडळींना दणका दिला आहे. त्यामुळे या मिसळ पार्टीची नेते मंडळींसह नाशिककरांमध्येही चर्चा सुरू होती.

ABOUT THE AUTHOR

...view details