मनमाड- राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी नाशिक जिल्ह्यातील नांदगांव, चांदवड, आदी भागात थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अडीअडचणी जाणून घेतल्या. शेतकऱ्यांना खत किंवा बि-बियाणे यासह इतर कोणत्याही बाबतीत अडचण आल्यास थेट माझ्याशी संपर्क करा असे आवाहन केले. तर यावेळी खत विक्रेत्यांना पुन्हा त्यांनी इशारा देत खतांचा काळाबर बाजार केला तर याद राखा, असा कडक इशाराही दिला.
खतांचा काळाबर बाजार केला तर याद राखा... कृषीमंत्र्यांचा खत विक्रेत्यांना इशारा
राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी आज नांदगांव तालुक्यातील भारडी, अनकवाडे यासह चांदवड तालुक्यातील कुंदलगाव निमून आदी गावात थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची त्यांच्या कुटुंबाची विचारपूस केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत आपुलकीने विचारपूस केली.
राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी नांदगांव तालुक्यातील भारडी, अनकवाडे यासह चांदवड तालुक्यातील कुंदलगाव निमून आदी गावात थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची त्यांच्या कुटुंबाची विचारपूस केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत आपुलकीने विचारपूस केली. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणी विचारत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. तर कमी पैशात जास्त उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांचे कौतुक केले. यावेळी त्यांनी सरकारतर्फे काय उपाययोजना कराव्या याबाबत शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडून माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासोबत तालुक्याचे आमदार सुहास कांदे, तालुकाकृषी अधिकारी जगदीश पाटील, तहसीलदार कुलकर्णी,यांच्या सह संबंधित विभागातील अधिकारी उपस्थित होते.
कृषी विभागाच्या विविध योजना असून त्यांचाच शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, तसेच खतांचा काळाबाजार करणाऱ्या व्यापाऱ्यांना देखील त्यांनी इशारा दिला असून कोणीही चढ्या भावाने खत व बियाणे विक्री केली तर याद राखा, असा इशारा देखील दिला आहे. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या लहान मुलांसोबत गप्पा केल्या व शाळेला सुट्टी का आहे, असे विचारले असता लहान मुलांनी देखील लॉकडाऊन आहे असे उत्तर दिले. राज्याचे कृषिमंत्री थेट बांधावर आल्याने शेतकऱ्यांना देखील आंनद झाला होता.