महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकरा मोबाईल व्हॅन उचलतील मालेगाव कोरोनामुक्तीसाठी खारीचा वाटा - कृषीमंत्री भुसे - मोबाईल व्हॅन

सारी व कोरोना सदृश्य आजाराची लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांवर प्रथमोपचार करून त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याने या अकरा मोबाईल व्हॅन कोरोनामुक्त मालेगाव करण्यात नक्कीच खारीचा वाटा उचलतील, असा विश्वास राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला.

अकरा मोबाईल व्हॅन उचलतील मालेगाव कोरोनामुक्तीसाठी खारीचा वाटा - कृषीमंत्री भुसे
अकरा मोबाईल व्हॅन उचलतील मालेगाव कोरोनामुक्तीसाठी खारीचा वाटा - कृषीमंत्री भुसे

By

Published : May 2, 2020, 11:37 PM IST

नाशिक - नॉन कोव्हिड रुग्णांची होणारी हेळसांड थांबविण्यासाठी ‘डॉक्टर आपल्या दारी’, या संकल्पनेतून मालेगावकरांच्या सेवेत एकाचवेळी अकरा मोबाईल व्हॅन दाखल झाल्या आहेत. या व्हॅनच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहेत. शहरातील विविध भागात जाऊन तेथील रुग्णांची त्याच ठिकाणी मोफत तपासणी व औषधोपचार करणार आहेत. या तपासणी मोहिमेत सारी व कोरोना सदृश्य आजाराची लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांवर प्रथमोपचार करुन त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याने या अकरा मोबाईल व्हॅन कोरोनामुक्त मालेगाव करण्यात नक्कीच खारीचा वाटा उचलतील, असा विश्वास राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला.

अकरा मोबाईल व्हॅन उचलतील मालेगाव कोरोनामुक्तीसाठी खारीचा वाटा - कृषीमंत्री भुसे

भारतीय जैन संघटना व फोर्स मोटर्स, महाराष्ट्र शासन, महानगरपालिका व सर्व डॉक्टर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय विश्रामगृह, मालेगाव येथे ‘डॉक्टर आपल्या दारी’ या मोहिमेचा शुभारंभ मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर ताहेरा शेख, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

'मोबाईल व्हॅनची गरज ओळखून जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून ही सेवा मालेगावकरांच्या सेवेत दाखल झाली आहे. प्रत्येक व्हॅनचे रिपोर्टिंग होणार असल्याने कोणकोणत्या भागात व किती रुग्णांवर उपचार करण्यात आले, याचा अहवालही मिळणार आहे. यामध्ये सारी व कोरोना या आजारांची लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांवरही लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे भुसे यावेळी म्हणाले.

'मालेगावमध्ये काम करताना एकीकडे कोरोनाशी लढा सुरू असताना नॉन कोव्हिड रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत होती. खासगी डॉक्टरांची सुविधाही तोकडी पडत असल्याचे लक्षात आल्यावर बाहेरून मदत घेणे गरजेचे होते. त्यामुळे भारतीय जैन संघटनेच्या शांतीलाल मुथा यांच्याशी चर्चा करून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला. त्यांच्यासोबत आम्हीदेखील 108 रुग्णवहिकेच्या सेवेची मदत उपलब्ध करून देणार आहोत. त्यामुळे कोव्हिड व नॉन कोव्हिड अशी दुहेरी आरोग्य सेवा या माध्यमातून उपलब्ध होणार असल्याने यापुढे नॉन कोव्हिड रुग्णांची हेळसांड होणार नाही, असे जिल्हाधिकारी मांढरे यांनी यावेळी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details